रानभाजी - कुडा
शास्त्रीय नाव : Holarrhena pubescens
कुळ : Apocynaceae
इंग्रजी नाव : Konesi Bark Tree
स्थानिक नाव : पांढरा कुडा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 9 सप्टेंबर 2024 :
औषधी गुणधर्म
कुडा या वनस्पतीच्या मुळाची साल व बिया औषधात वापर करतात. कुष्ठरोग व त्वचा रोगात ही गुणकारी आहे. मूळव्याध, थकवा यात कुडाच्या बियाचा वापर होतो. अन्न पचनासाठी कुडाच्या बियाचे चूर्ण उपयोगी ठरते. अतिसार, ताप, कावीळ, कफ, पित्तकोष यासाठी कुडाची साल वापरण्यात येते.
पाककृती
# साहित्य - कुड्याची फुले, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथींबीर.
# कृती - एक पातेले घेउन त्यात एक ग्लास पाणी व कुडाची फुले उकळुन घ्यावे. नंतर त्यातील पाणी नितळुन घ्यावे. नंतर एक पातेले घेउन त्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद तळून घ्यावे. नंतर त्यामध्ये अकळलेले कुडाची फुले टाकुन शिजु द्यावे. नंतर कोथींबीर टाकावे. अशा प्रकारे आपल्या आवडीची कुडाची फुलेची भाजी तयार होईल.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

0 टिप्पण्या