सौ. रंजिता अजय गाढवे यांची तरडे गावच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 14/9/ 2024 : तरडे (तालुका हवेली, जिल्हा पुणे) गावच्या उपसरपंचपदी सौ. रंजिता अजय गाढवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सौ.रेश्मा गायकवाड यांनी ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली.उपसरपंच पदासाठी सौ. रंजिता अजय गाढवे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामसेवक महेश खाडे यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले.
ग्रामदैवत श्री.भैरवनाथ आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यामातेचे पुष्पहार अर्पण, दर्शन घेऊन सर्वांना कपाळी गुलाल लाऊन पेढे वाटून सर्वांनी अभिनंदन केले. यावेळी सरपंच अभिषेक दाभाडे, रेश्मा गायकवाड, शरद जगताप, अश्विनी गवते, मीना कोळेकर, अनिता कुरकुंडे, खंडू गडदे, किसन बनकर, वसंत जगताप, सुदाम काळे, युवराज काळे, बापू बनकर, किसन मेमाणे, बाळू मेमाणे, समीर जाधव, काळूराम कुरकुंडे, पोपट कुरकुंडे, गणेश मेमाणे, नामदेव गडदे, भिकाजी गाढवे, अंकुश कोतवाल, प्रकाश काळे, रूपक गवते, शिवाजी बरकडे, दिलीप गाडेकर, अप्पा वाघमोडे, माणिक सुपणार, राहुल आगलावे, संदीप गाढवे, अमोल गाढवे, विनायक गाढवे, अशोक गाढवे, सतीश गाढवे, सुभाष कोतवाल, सुखदेव गाढवे, मच्छिंद्र गाढवे, बाळासाहेब कोळेकर, अजय गाढवे, लक्ष्मण गाढवे तसेच तरडे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन राष्ट्रीय सल्लागार समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि नॅशनल युनियन बॅकवर्ड एस सी एसटी अँड मायनॉरिटी अर्थात एन यु बी सी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख व प्रदेश प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांनी भ्रमणध्वनी वरून अजय गाढवे यांच्या माध्यमातून नवनिर्वाचित उपसरपंच सौ. रंजिता अजय गाढवे यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.
.jpg)
0 टिप्पण्या