💢श्रीपूर येथील ब्रिमा सागर कारखान्यात कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या 🟦कारखाना प्रशासनातील मुख्य अधिकारी यांना तात्काळ अटक करा अशी मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

 

💢श्रीपूर येथील ब्रिमा सागर कारखान्यात कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

🟦 कारखाना प्रशासनातील मुख्य अधिकारी यांना तात्काळ अटक करा अशी मागणी करत

मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/ वृत्त एकसत्ता न्यूज 

मुंबई दिनांक 19/9/2024 : श्रीपूर (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील ब्रिमा सागर महाराष्ट्र डिसलरी या मद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यामध्ये आज गुरुवारी सकाळी आठ वाजण्याचे सुमारास संतोष नामदेव मोरे (वय 48) हा कायम सेवेत असणारा  कर्मचारी नेहमीप्रमाणे जनरल पाळीवरती आला होता. त्याने बॉक्स तयार करण्याच्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या खोलीमध्ये प्लास्टिक दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलीस तपास सुरू आहे.  अकलूज पोलीस स्टेशनचे एपीआय चौधरी, एएसआय  बाळासाहेब पानसरे, व त्यांच्या इतर सर्व पोलीस यांनी घटनास्थळाला भेट दिली.  

संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करा नातेवाईकांची मागणी

यावेळी संतोष मोरे यांचे नातेवाईक, परिसरातील लोकप्रतिनिधी आणि काही कामगारांनी सुरुवातीला प्रेत खाली घेण्यासाठी विरोध केला.  कारखाना प्रशासनातील अधिकारी या घटनेस जबाबदार आहेत असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.  कारखाना प्रशासनातील मुख्य अधिकारी यांना तात्काळ अटक करा, त्यानंतरच प्रेत खाली घ्या, यामुळे पोलीस ,नातेवाईक आणि स्थानिकांमध्ये बराच वेळ बाचाबाची झाली, तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. 

शवविच्छेदना नंतर मृतदेह कारखान्यासमोर ठेवणार

नातेवाईक, स्थानिक  लोकप्रतिनिधीच्या आणि पोलिसांच्या मध्यस्थीने पंचनामा करून जिल्हा उप रुग्णालय अकलूज येथे शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यात आला आहे. परंतु शवविच्छेदन झाल्यानंतर जोपर्यंत कारखाना प्रशासनातील मुख्य अधिकारी यांना अटक होत नाही. तोपर्यंत अंत्यविधी केला जाणार नाही असे नातेवाईकाने भूमिका घेतली होती परंतु सायंकाळी  पोलिस आणि स्थानिक लोकप्रतिनिधीच्या मदतीने नातेवाईकांचे सांत्वन करून रात्री उशिरा श्रीपुर स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. 

तथापी 🟣 संतोष नामदेव मोरे यांनी आत्महत्या केली की त्यांना फासावर लटकावले? 🟢 खोलीमध्ये मृतदेह असताना सदर खोलीस कोणी व का कुलूप लावून बंद केले होते? 🟠 दुर्दैवी घटना सकाळी घडूनही दुपारी बारा वाजेपर्यंत तरी प्रशासनातील कोणताही अधिकारी त्या ठिकाणी का आला नाही? 🟢 कामगारांना जाणीवपूर्वक मानसिक, शारीरिक त्रास देण्याचा प्रशासनातील अधिकाऱ्यांवर होणाऱ्या आरोपांबाबत प्रशासन गप्प का ?♦️प्रमुख अधिकाऱ्याला हिटलरची उपमा जाहीरपणे का  देण्यात येत आहे? इत्यादी प्रश्न खुलेआम घटना स्थळी उपस्थितांनी संतप्तपणे उपस्थित केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या