"फडणवीससाहेब, इतिहासाच्या पुस्तकाला भुगोलाच्या पुस्तकाचे कव्हर घालू नका"

 

"फडणवीससाहेब, इतिहासाच्या पुस्तकाला भुगोलाच्या पुस्तकाचे कव्हर घालू नका"

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

संग्राहक : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 02/09/2024 : उपमुख्यमंत्री फडणवीससाहेब हे इतिहासाचे प्राध्यापक झालेले दिसतात. त्यांच्याकडे गृहखाते आहे... महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था स्थिती सांभाळणे हे त्यांचे काम... पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला होत आहे... ते खाते फडणवीस यांच्याकडे आहे... त्यांच्या खात्यात त्यांनी लक्ष घालून हा धटींगणपणा थांबवावा... ते न करता ‘इतिहासाचा प्राध्यापक’ म्हणून त्यांनी स्वत:चे हसे करून घेऊ नये. अनेक विषयांत त्यांचे हसे झाले आहे. आता ते इतिहासाच्या पुस्तकाला भुगोलाच्या पुस्तकाची कव्हरे घालत आहेत. त्यांनी तो सगळा विषय थांबवावा...

महाराष्ट्रातील सर्व जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तोंडपाठ आहे... सुरतची घटना इतिहासाने स्पष्टपणे लिहिलेली आहे... वासुदेव सितारम बेंद्रे यांच्यापेक्षा फडणवीस इतिहासात अधिक प्रवीण आहेत, असा आव त्यांनी आणलेला आहे...  फडणवीस यांनी श्री. बेंद्रे यांचे १९२८ साली लिहिलेले ‘साधना चिकित्सा’ हे पुस्तक जरा वाचावे... सुरतच्या महाराजांच्या स्वारीबद्दल फडणवीस यांनी आता जास्त न बोलणे त्यांच्या हिताचे ठरेल... त्यांची महाराष्ट्रातील प्रतिमा ही ‘तोड-फोड’वाले अशीच झाली आहे. महाराष्ट्राचे राजकारण नासवण्यात त्यांचा प्रमुख वाटा आहे... हे इतिहासात लिहिले जाणार आहे... त्यांची तुलना ‘पाथरवट’ कारागिराशीसुद्धा करता येणार नाही...कारण तो कारागिर पाषाणातून भव्य आणि सुंदर मूर्ती तयार करतो.... आणि महाराष्ट्राचे हे उपमुख्यमंत्री चिन्ही-हातोड्याने राजकीय तोडफोड करतात... आणि म्हणूनच श्री. रविंद्र वायकर यांच्यासारख्यांना स्पष्टच सांगावे लागले की, ‘माझ्यासमोर दोनच पर्याय होते... एक पक्षबदल, नाही तर तुरूंग...’  हे त्यांचे वाक्य महाराष्ट्राच्या राजकारणाचा आजचा पोत किती खालच्या दर्जाचा आहे, याचा पुरावा आहे. फडणवीसांना आता ते वाक्य पुसून टाकता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत जे काही घडले त्यात महाराजांची विटंबना झालीच पण यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ‘निवडणुकीसाठी शिवाजी महाराजांना वापरण्याकरिता पुतळा घाईघाईने बसवला....’ हा मुख्य आक्षेप आहे. अनुभव नसलेल्या आपटे याला काम कुणी दिले, याचे उत्तर अजूनही कोणी देत नाही... आणि तो फरार का झाला? त्याचेही उत्तर मिळत नाही... त्यामुळे मुख्य प्रश्न बाजूला पडलेलेले आहेत... सुरतशी येथे काहीही संबंध नाही. पुतळा उभा करणे.... आठच महिन्यांत तो कोसळणे... आणि त्यामुळे महाराष्ट्रात संताप निर्माण होणे याच्याशी सुरतचा काहीही संबंध नाही.... छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकर यांची तुलना करण्याचा या ठिकाणी कोणताही विषय नाही. वडाची साल पिंपळाला लावू नका... विषयाला धरून न बोलता, फडणवीस सुरतला कुठे निघाले? यापूर्वी उद्धव सरकार पडण्यापूर्वी शिंदे आणि त्याचे साथीदार २० जून २०२२ रोजी सुरतकडे धावलेे होते... या सरकारचा ‘सुरत’शी संबंध (व्हाया: गोवा) गुहाहटीला जाण्यापुरताच  आणि तिथून ‘अधिक सुरक्षित जागा शोधण्याकरिता’ त्यांनी सुरतहून गुवाहटी गाठली. (काय झाडी...काय डोंगर... काय ‘हाटील...’- इति: शहाजीबापू) त्यामुळे

फडणवीससाहेबांच्या इतिहासाचे ज्ञान अतिशय अगाध आहे... आणि भुगोलातही ते ‘मास्टर’ आहेत. राजकीय इतिहास बदलण्याच्या प्रयत्नात ते भुगोलही बदलत आहेत. पण कृपाकरून महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाच्या पुस्तकाला भुगोलाच्या पुस्तकाची कव्हरे घालण्याचा कार्यक्रम करू नका.... विधानसभा निवडणूक लांबवणीवर टाकण्याचे काम योजनापूर्वक झालेले आहे... त्याचा फायदा मिळेल, अशी त्या मागची त्यांची कल्पना होती.... पण प्रत्येक दिवशी बुडत्याचा पाय खोलात आहे... त्यामुळे फडणवीससाहेब, निवडणूक जास्त दिवस लांबवतील तेवढे तुम्ही अधिक खड्ड्यात जाल... त्यामुळे तुम्ही जे बोलता त्याचा महाराष्ट्रातला संताप अधिक वाढतच आहे... फक्त आता बोलताना तुमचा अंगठा आणि त्याच्या जवळचे बोट याचे ‘आळे’ करण्याचे जरा थांबवा... तुमचा चेहरा चांगला आहे... पण ते आळे चांगले दिसत नाही हो....

सध्या एवढेच...अनेक

- मधुकर भावे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या