पेठ वडगाव येथे पँथर गणेशा कडून भव्य प्राचीन कालीन मंदिराची प्रतिकृतीची निर्मिती

 

पेठ वडगाव येथे पँथर गणेशा कडून भव्य प्राचीन कालीन मंदिराची प्रतिकृतीची निर्मिती

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

पेठ वडगाव / अनिल पाटील  दिनांक 15/9/ 2024 : येथील 21 वर्षीय पँथर गणेशा कडून पेठ वडगाव व पंचक्रोशीमध्ये प्रथमच भव्य प्राचीन कालीन मंदिराची प्रतिकृतीची निर्मिती करण्यात आली आहे.

गणेश आगमन मिरवणूक पारंपरिक वाद्यात करून विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. संपूर्ण गणेशोत्सवामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. यामध्ये रक्तदान शिबिर, धार्मिक कार्यक्रम, येणाऱ्या भाविक भक्तांना लाडू प्रसाद वाटप, माझी वसुंधरा उपक्रम, अथर्वशीर्ष पठण, महिलांसाठी विविध कार्यक्रम, भजन-कीर्तन असे अनेक कार्यक्रम चालू असून या भव्य अशा मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला असून हे मंदिर सर्व गणेश भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. तसेच 13/09/24 रोजी रक्तदान शिबिर मध्ये एकूण 50 बॅग रक्त संकलन करण्यात आले. हे ब्लड संकलन करण्यास संजीवनी ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.


प्राचीन मंदिर उद्घाटन सोहळा लोकनियुक्त नगराध्यक्ष मोहनलाल माळी, सचिन चव्हाण, दलित मित्र अशोकराव माने, डॉक्टर अभय यादव, संतोष लडगे, रमेश शिंपणेकर, राजेंद्र जाधव,रवी पाटील,भावेश शहा, जगदीश शिंपणेकर,सुहास राजमाने, मूर्तिकार रोहन कुंभार, मंडप सजावट चे सुर्यवशी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी मंडळातील पदाधिकारी सर्व सदस्य महिला सदस्य व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या