💢 अकलूज नगरपरिषद कार्यालयात शांतता कमिटीची बैठक संपन्न
🟥 विघ्नहर्ता पारितोषिक 2023 चे बक्षीस वितरण
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 01/09/2024 : आगामी दिनांक 07/09/2024 ते दिनांक 17/09/2024 या कालावधीत श्री. गणेश उत्सव सर्वत्र साजरा केला जाणार असल्याने त्याअनुषंगाने अकलूज पोलीस ठाणे व अकलूज नगरपरिषद यांचेवतीने सार्वजनिक गणेश मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य, गणेशमुर्ती विक्रेते, अकलूज पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील, पत्रकार बांधव, जेष्ट नागरीक यांची दिनांक 31/08/2024 रोजी नगरपरिषद कार्यालय, अकलूज येथे शांतता कमिटी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये नगरपरिषद सी.ई.ओ. दयानंद गोरे, अकलूजचे माजी ग्रामपंचायत सरपंच किशोरसिंह माने पाटील, अकलूज पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, विघ्नहर्ता पारितोषिक परीक्षक ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
अकलूज नगर परिषद आणि अकलूज पोलीस ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास "विघ्नहर्ता पारितोषिक 2023" चे सर्वोत्कृष्ट प्रथम तीन क्रमांकाचे पारितोषिक वितरण यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रस्ताविकामध्ये आगामी उत्सवा बाबत सविस्तर माहिती देत शासनाच्या नियमानुसार गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करीत सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ विभाग वार पहिल्या तीन क्रमांकासाठीचे नियम निकष आणि एकूण गुण व त्यांच्या वर्गवारीनुसार सविस्तर माहिती सांगितली. अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी आगामी गणेश उत्सवाचे अनुषंगाने सर्व गणेश मंडळांना ऑनलाईन परवानगी घेणेबाबत, डॉल्बी, डी.जे. न वाजवता पारंपारीक वाद्य वाजवुन प्रदुषण मुक्त व पर्यावरण पुरक वातावरणामध्ये गणेश उत्सव साजरा करणेबाबत, सामजिक तेढ निर्माण करणारे देखावा सादर न करणेबाबत, गणेश मुर्तीचे पावित्र्य राखण्याचे अनुषंगाने आवश्यक ती उपाययोजना करुन गणेश उत्सव मंडळामध्ये आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कँमेरे बसविणेबाबत, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अशा रितीने मुर्ती स्थापना करणेबाबत तसेच जिल्हा स्तरावरील उत्कृष्ट गणपती, उत्कृष्ट समाजउपयोगी देखावा याबाबत शासन स्तरावर असलेले बक्षीस योजनेबाबत व अकलूज नगरपरिषद व अकलूज पोलीस ठाणे यांचेतर्फे आयोजित सर्वोत्कृष्ट गणेशोस्तव मंडळ निवड याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले. राष्ट्रीय पीछडावर्ग, अनुसूचित जाती जनजाती एवं अल्पसंख्यक महासंघ दिल्ली अर्थात एन.यू.बी.सी.चे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख व प्रसिद्धीप्रमुख,सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ निवड समितीचे परीक्षक जेष्ट पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाचे जिल्हा पातळीवरील बक्षीस माळशिरस तालुक्याला मिळू शकेल अशा तोडीचे उपक्रम आपल्या तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून वर्षभर राबवले जात आहेत. हे गेल्या दोन-तीन वर्षापासून "विघ्नहर्ता पारितोषिक परीक्षक" म्हणून काम करीत असताना प्रकर्षाने जाणवले आहे. शासनाचे रोख रकमेचे पारितोषिक तालुक्याला मिळावे या दृष्टीने सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी निवडीचे निकष नियमांचे तंतोतंत पालन करून हे बक्षीस तालुक्याला मिळवून द्यावे असे आवाहन केले. अकलूज ग्रामपंचायत माजी सरपंच किशोरसिंह मारुतराव माने पाटील यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना म्हटले की पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्षारोपण दत्तक पालन पद्धतीने केले तर अधिक प्रभावी ठरेल तसेच गणेशोत्सव कालावधीमध्ये कोणत्याही धर्मातील घटकाची अंत्ययात्रा गणेश मंडळ परिसरातून निघालेली असेल त्यावेळी मानवता धर्म म्हणून मंडळाचे साऊंड सिस्टिम त्यावेळे पुरते बंद करून आपल्या महान संस्कृतीचे महान दर्शन घडवावे असे सांगून अकलूज मधील गांधी चौक, सदूभाऊ चौक आणि जुन्या एसटी स्टँड चौकातील वाहतुकीबाबत मौलिक सूचना केल्या.
सदरची शांतता कमिटी बैठक पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी गतवर्षीच्या सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची नावे "विघ्नहर्ता पारितोषिक" समितीच्या वतीने परीक्षक भाग्यवंत ल. नायकुडे यांनी नगरपरिषद अकलूज व अकलूज पोलीस ठाणे यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानुसार "विघ्नहर्ता पारितोषिक 2023" चे बक्षीस वितरण करण्यात आले. सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ 2023 ची यादी पुढील प्रमाणे आहे.
विघ्नहर्ता पारितोषिक 2023
===================
शहर छोटा गट
==========
प्रथम क्रमांक :-
हनुमान तालीम गणेशोत्सव मंडळ, अकलूज.
अध्यक्ष : भालचंद्र भगवान भोसले
मोबाईल नंबर 70 58 58 73 77
द्वितीय क्रमांक :-
पगडी चा राजा गणेशोत्सव मंडळ, घरकुल अकलूज.
अध्यक्ष :- अजय बाळू पाटील
मोबाईल नंबर 91 45 28 25 04
तृतीय क्रमांक :-
दत्तगुरु गणेशोत्सव मंडळ दत्तनगर अकलूज अध्यक्ष योगेश महादेव गरड
मोबाईल नंबर 99 6000 28 30
+++++++++++++++++++++
अकलूज शहर मोठा गट
===============
प्रथम क्रमांक :-
श्री छत्रपती गणेशोत्सव मंडळ गोळीबार चौक अकलूज.
अध्यक्ष डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील /उपाध्यक्ष गोपाळ सोमनाथ गुळवे
मोबाईल नंबर 74 98 66 32 08
द्वितीय क्रमांक :-
बुरुजा गणेशोत्सव मंडळ अकलूज. अध्यक्ष सुरज विनोद कोतमिरे मोबाईल नंबर 96 89 54 33 33
तृतीय क्रमांक :-
वसंत विहार पोलीस कॉलनी गणेशोत्सव मंडळ अकलूज.
अध्यक्ष अनिलकुमार रेवप्पा मदभावी
मोबाईल नंबर 97 30 33 33 57
+++++++++++++++++++++
ग्रामीण भाग
==========
प्रथम क्रमांक :-
शिवछत्रपती गणेशोत्सव तरुण मंडळ शिवाजीनगर श्रीपुर
अध्यक्ष नामदेव राजू कदम
मोबाईल नंबर 95 45 34 36 75
द्वितीय क्रमांक :-
नंदेश्वर गणेशोत्सव मंडळ लवंग
अध्यक्ष आकाश हरी सोबनर मोबाईल नंबर 85 30 49 7002
तृतीय क्रमांक :-
श्री मोरया गणेशोत्सव मंडळ श्रीनाथनगर बोरगाव
अध्यक्ष श्रीनाथ हरिदास काशिद
मोबाईल नंबर 73 78 48 60 60
+++++++++++++++++++++
यावेळी अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, अकलूज ग्रामपंचायत माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, विघ्नहर्ता पारितोषिक समितीचे परीक्षक भाग्यवंत नायकुडे, अकलूज नगर परिषद प्रतिनिधी रोहित विकास शेटे, पोलीस प्रतिनिधी शिवकुमार मदभावी, पत्रकार दत्तात्रय नाईकनवरे, सागर खरात, नागेश लोंढे, यांचे सह पोलीस पाटील विविध मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. शेवटी नगरपरिषदेचे काशीद यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 टिप्पण्या