💢रत्नत्रय पतसंस्था देणार सभासदांना 13 टक्के लाभांश : अनंतलाल दोशी
🟪 रत्नत्रय पतसंस्थेची 20 वी वार्षिक सभा खेळीमेळीत
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क / वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 23/9/2024 : ,सदाशिवनगर, (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र राज्य)येथील आपल्या रत्नत्रय पतसंस्थेची वाटचाल चांगल्या पद्धतीने चालू असून चालू वर्षी संस्था सभासदांना 13% लाभांश देण्यात येणार असल्याचे पतसंस्थेचे संस्थापक अनंतलाल रतनचंद दोशी यांनी संस्थेच्या 20 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलताना सांगितले. यावेळी संस्थेचे चेअरमन विरकुमार दोशी, व्हा. चेअरमन डॉ. निवास गांधी, संचालक , प्रमोद दोशी,अजय गांधी, रामदास गोपने,जगदीश राजमाने, सोमनाथ राऊत, विलास साळुंखे , सौ.अनिता दोशी व सचिव ज्ञानेश राऊत यांचे सह सर्व सभासद उपस्थित होते.
प्रारंभी ज्येष्ठ सभासद गोरे यांचे हस्ते भगवान महावीरांच्या व तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर दीप प्रज्वलन ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, रत्नत्रय परिवाराचे सर्वेसर्वा व रत्नत्रय पतसंस्थेचे संस्थापक अनंतलाल रतनचंद दोशी, चेअरमन वीरकुमार दोशी, व्हाईस चेअरमन डॉक्टर श्रीनिवास गांधी, तज्ञ संचालक प्रमोद दोशी, ॲड. शिवाजी मदने इत्यादी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
पुढे बोलताना दोशी म्हणाले की या पतसंस्थेची स्थापना परिसरातील छोटे व्यवसायिकांना सुलभ रीतीने कर्ज मिळावे त्याची उन्नती व्हावी या उद्देशाने करण्यात आली असून या संस्थेच्या प्रगतीस सर्व सभासद, ठेवीदार, संचालक व कर्मचारी वर्ग यांचा मोठा सहभाग असून ही पतसंस्था सगळ्यांना चांगली सेवा देत आहे. आर्थिक व्यवहाराबरोबरच ही संस्था अनेक सामाजिक कार्य ही करत आहे.
सभेचे प्रास्ताविक संस्थेचे कर्तव्यदक्ष संचालक प्रमोद दोशी यांनी केले. संस्थेची स्थापना 2004 झाली असून संस्थेमार्फत सभासदांसाठी भारतात कुठेही आरटीजीएस व एनएफटी ची सोय करण्यात आलेली आहे. डी डी काढण्याची सॊय, लाईट बिल भरण्याची सोय, क्यू आर कोड पेमेंट सॊय , पिग्मी व आर डी तसेच लखपती मासिक ठेव अशा विविध सेवा चालू केलेल्या आहेत. तसेच सर्व कर्जदारांची पिग्मी ची रक्कम दर महिना अखेर ला कर्ज खात्यामध्ये जमा करण्याची सॊय अशा विविध सेवा संस्थेमार्फत सभासदांना देण्यात येत आहेत असे त्यांनी सांगितले.
वार्षिक सभेचा अहवाल वाचन संस्थेचे चेअरमन विरकुमार दोशी यांनी केले. त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख सभासदांना दाखवला. 31 मार्च 2024 अखेर संस्थेकडे 22 कोटींच्या ठेवी असून कर्जवाटप 18 कोटी रुपये आहे. तसेच संस्थेची गुंतवणूक 8 कोटी 48 लाख रुपये इतकी आहे. संस्थेचे एकूण वसूल भांडवल 44 लाख 23 हजार रुपये इतके आहे. तसेच संस्थेचे एकूण उत्पन्न 2 कोटी 45 लाख रुपये असून खर्च 2 कोटी 16 लाख रुपये झाला असून वार्षिक उलाढाल 137 कोटी 21 लाखा रु इतकी झाली आहे. संस्थेला चालू वर्षी 29 लाख 22 हजार रुपये नफा झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संस्थेला या वर्षी ऑडिट वर्ग "अ" मिळाला असून सर्व सभासदांना संस्था 13% लाभांश देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संस्थेचे सभासद भगवान शिंदे व ऍड. शिवाजी मदने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व संस्था सभासदांना देत असलेल्या सेवे बद्दल कौतुक केले तसेच सभासदांना 13% लाभांश दिल्याबद्दल आभार मानले. सभेपुढील विषय वाचन संस्थेचे सचिव ज्ञानेश राऊत यांनी केले संस्थेचे तेरीज ताळेबंद नफा तोटा व अंदाजपत्रक यावेळी त्यांनी सभासदांसमोर वाचून दाखवले तसेच एक ते आठ या विषयावर सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. सर्व सभा आनंदी व खेळीमेळी च्या वातावरणात पार पडली.सालाबाद प्रमाणे याही वर्षी वेळेवर येणाऱ्या सभासदांना लकी ड्रॉ द्वारे बक्षिसे काढण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक मुकुंद कापसे, द्वितीय क्रमांक सतीश गांधी व तृतीय क्रमांक सुरेश धाईजे यांना अनुक्रमे बक्षिसे लागली. तसेच सर्व हजर सभासदांना स्वादिष्ट भोजनाची सोय यावर्षी संस्थेमार्फत करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने सभासद व पत्रकार बंधू उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव ज्ञानेश राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन जगदीश राजमाने यांनी मानले. सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे कर्मचारी व पिग्मी एजंट यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या