💢 दिव्याच्या पूजेची अमावस्या. 🟣 भारतीय अस्मिता, संस्कृती जपुया

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई : रविवार ४ ऑगस्ट रविवार रोजी दीप अमावस्या  दिव्याची अमावस्या आहे. संध्याकाळी देवासमोर दिवा लावून  “शुभं करोति कल्याणम्”  म्हणून घरातील वडीलधार्‍यांना नमस्कार करणे हा संस्कार पिढ्यां पिढ्या चालत आला आहे. आता आधुनिक  जगात वि‍जेच्या दिव्यांचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर मात्र तेल किंवा तुपाचाच दिवा लावतो. कारण त्याचा सात्विक प्रकाश अंधार दूर करतो आणि नजरेलाही सुखद, पवित्र वाटतो.

दिवा मांगल्याचे प्रतिक आहे.

दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. भरपूर पाऊस व अंधारून येणे हे तर श्रावणाचे वैशिष्ट्य आहे. घरातील इकडे तिकडे ठेवलेले, धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने, लामणदिवे या सर्वांना एकत्र करून, घासून पुसून लख्ख करून ठेवण्याचा हा दिवस असतो. या दिवशी, सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवावेत. पाटाभोवती सुरेख रांगोळी रेखाटावी. सर्व दिव्यांमध्ये तेल वात घालून प्रज्वलित करावेत. कणकेचे गोड दिवे (उकडलेले) बनवतात. ओल्या मातीचे दिवेही बनवून पूजेत मांडतात. या सर्वांची हळद कुंकू , पिवळी फुले, दूर्वा ( दूर्वा ही वंश वृध्दीचे प्रतीक आहे त्यामुळे दूर्वा अर्पण करून प्रार्थना करावी ) , आघाडा, अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी. गोडाचा नैवेद्य दाखवावा. यावेळी खालील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.

"दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम !!

गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:!!

अर्थ :-- हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस.मा‍झ्या पूजेचा स्वीकार कर आणि मा‍झ्या सर्व इच्छा पूर्ण कर.

‼️आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करावे.‼️

आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्व आहे, 

प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते.

घरातील इडापिडा टाळून, अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दिप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते.

काही ठिकाणी या दिवशी पित्रृ तर्पण देतात. आपल्या पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य देखील काही ठिकाणी  दाखवतात. पितरांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करण्याचा विधी म्हणजे पितृ तर्पण. अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असे मानले जाते. घरातील इडापिडा टाळून, अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या