श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर खंडाळी येथे श्रावणी सोमवार निमित्त श्री शांतवन व अग्नीहोम सोहळा संपन्न



श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर खंडाळी येथे श्रावणी सोमवार निमित्त श्री शांतवन व अग्नीहोम सोहळा संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 26 ऑगस्ट 2024 

श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर खंडाळी (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) येथे श्रावणी सोमवार निमित्त आयोजित श्री शांतवन व अग्नीहोम प्रज्वलन प्रचारक भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी श्री सोमेश्वर मंदिर खंडाळी चे प्रमुख आत्माराम शंकर खंडागळे महाराज, आप्पा निवृत्ती मोरे महाराज, सुनील ज्ञानेश्वर कांबळे, गौतम खंडागळे, सोमनाथ खंडागळे, महेश खिलारे, राकेश विठ्ठल बाबर, बाबाजी अर्जुन शेगर, भजनदास खंडागळे इत्यादींसह विविध ठिकाणहून आलेले शिवशक्ती भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परंपरेनुसार श्रावण महिन्यात चार सोमवार आले की तिसऱ्या सोमवारी व  पाच सोमवार आले की चौथ्या सोमवारी खंडाळी येथील सोमेश्वर मंदिरामध्ये धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.

यावर्षी श्रावणातले पाच सोमवार आल्यामुळे दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी मंदिरातील शिवलिंगास अभिषेक करून श्री सोमनाथ महात्म्य ग्रंथ पारायण घेत घेत मानाचे प्रचारक नायकुडे यांच्या हस्ते सोवळ्यामध्ये शांतवन घालून पूजा करून शांतवनानंतरची आरती घेण्यात आली. त्यानंतर रात्री मंदिरात श्री सोमेश्वर विनवण्यांचा त्याचबरोबर देवी गीतांचा कार्यक्रम पार पडला दरम्यानच्या कालावधीमध्ये आत्माराम खंडागळे यांच्या हस्ते अग्निहोमाच्या जागेचे पूजन करून होमाची विधिवत उभारणी करण्यात आली. त्यानंतर रात्री सव्वा दहा वाजण्याच्या दरम्यान मंत्र जयघोषात अग्निहोम प्रज्वलित करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या