"मुजोर राज्यकर्त्यांनो सहकारी साखर कारखाने, संस्थां राजकीय अड्डे नव्हेत..."- विठ्ठल राजे पवार

 "मुजोर राज्यकर्त्यांनो सहकारी साखर कारखाने, संस्थां राजकीय अड्डे नव्हेत..."- विठ्ठल राजे पवार


वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे. 

मुंबई दिनांक 5ऑगस्ट 2024 : 

"मुजोर राज्यकर्त्यांनो सहकारी साखर कारखाने, संस्था राजकीय अड्डे नव्हेत..." असा खणखणीत इशारा देत "साखर कारखानदारी, दूध  संस्था, सोसायटी इत्यादी  संस्था या कोणा राजकीय पक्षाच्या नेत्यांची मक्तेदारी नाही, सत्तेचा माज जास्त दिवस टिकत नाही. सत्ताधारी राज्यकर्त्यांनी डोकं ठिकाणावर ठेवून सहकारी संस्था मोडीत निघणार नाहीत याची दक्षता घ्यावी" असा सडेतोड सल्ला शरद जोशी विचार मंच शेतकरी महासंघाचे अध्यक्ष राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी  संस्थाचालकांना जाहीरपणे दिला.निपाणी कोल्हापूर येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यां बरोबर संवाद साधताना ते बोलत होते. राजकीय नेत्यांच्या खाजगी साखर कारखान्यांनी एफआरपीत केलेला, तोडणी वाहतूक घोटाळा व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांच्या थकहानी प्रकरणी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना सर्वोच्च न्यायालय, अन्न आयोग व राज्यपालांकडे तक्रार दाखल करणार. असल्याचे ऊस नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य विठ्ठल राजे पवार यांनी जाहीर केल्याची माहिती महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यातल्या सहकारी संस्थांमध्ये राज्यकर्ते आणि विरोधक असा चुकीचा वाद निर्माण करून सहकारी संस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असून हा प्रयत्न अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने संघटना राज्य आयोग व महाराष्ट्र राज्याचे राज्यपालांकडे तक्रार असल्याचे सांगत राजे पवार पुढे म्हणाले की राज्यातील अनेक सहकारी व खाजगी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी दिलेली नाही अनेक साखर कारखान्यांकडे एफ आर पी ची थकबाकी आहे तसेच अनेक साखर कारखान्यांनी प्रचंड मोठे आर्थिक घोटाळे केलेले आहेत त्यामध्ये अशोक सहकारी १०० कोटी, इंदापूर सहकारी दीडशे कोटी, माळेगाव, सोमेश्वर सह,वृद्धेश्वर, संत दामाजी, किसनवीर, वारणा कोरे, विठ्ठल रुक्माई, आंबेजोगाई सहकारी या साखर कारखान्यांनी प्रचंड मोठे आर्थिक घोटाळे केलेले आहेत. बाबत संघटनेने अत्यंत गंभीर तक्रारी न्यायालय व राज्य सरकारकडे केलेली आहे त्यांची राज्याच्या कॅगमार्फत चौकशी होणे क्रमप्राप्त होते. राज्यात ८ ते ९ साखर कारखान्यांनी तोडणी वाहतूक एफआरपीत महा घोटाळा केलेल्या सह ११ साखर कारखान्यांना राज्य सरकारने १५९० कोटी रुपयांची थक हमी दिली मात्र त्यामधून *"राजगड सहकारी आणि सहकार महर्षी कोल्हे शिंगणापूर या दोन सहकारी साखर कारखाने सहकारी संस्थांना राजकीय द्वेवेश्या पोटी थक हमी  नाकारलेली आहे हे अत्यंत चुकीचे व शेतकऱ्यांच्या संस्था अडचणीत आणण्याचा प्रकार आहे.! सहकारी साखर कारखाने  कोणत्याही नेत्याची मक्तेदारी नसून पुणे व नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत हे राज्य सरकार व मदत करणाऱ्या राजकीय नेत्यांनी नीट डोक्यात ठेवावे. अन्यथा ही वेळ त्यांच्यावर पण आलेली होती, संघटना ती पुन्हा त्यांच्यावर आणू शकते हेही त्यांनी डोक्यात ठेवावे, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था लुटून त्या जरी खाजगी साखर कारखाने काढले याचा अर्थ ते अडचणीत येऊ शकत नाहीत असं समजू करून घेऊ नये.! ते देखील एक ना एक वेळा अडचणीत येतील हे त्यांनी जाणीवपूर्वक लक्षात ठेवावे, गेल्या हंगामामध्ये राज्यातील दोन-तीन सहकारी साखर कारखाने बंद होते त्यामध्ये पुणे घोडगंगा आणि कुकडी अहमदनगर हे बंद होते राज्य सरकारने सहकारी संस्थांना थक आम्ही देताना ती कोणाच्याही मालकीचे आहेत हे न पाहता सहकारी संस्था शेतकरी सभासदांचे आहेत हे डोक्यात ठेवून सर्व साखर कारखान्यांना तो कमी द्यावी अन्यथा कुटते कारखान्याला तर्काने देऊ नये बाबत शरद जोशी विचार मंच शेतकरी  संघटनेने राज्य सरकारवर सडकून टीका केलेली आहे.          घोटाळेबाज राज्यकर्त्यांकडून घोटाळेबाज सहकारी संस्थांच्या घोटाळेबाजांना राजकीय पोळी भाजण्यासाठी सरकारी तिजोरीतील सर्वसामान्यांचे पैशाचा जो भट्ट्याबोळ लावलेला आहे तो बरोबर नाही. शेतकऱ्यांच्या किंवा विरोधी पक्षांच्या बाजूने असणाऱ्या साखर कारखान्याचे चेअरमन आमदारांना राजकीय दोषापोटी कोंडीत पकडणाऱ्यानी डोके ठिकाणावर ठेवून काम करावे. आम्हीही टीका करतो ही द्वेषा पोटी नसून शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या संस्था अडचणीत आणणाऱ्या भ्रष्ट राज्यकर्त्यांची डोकी ठिकाणावर आणण्यासाठी आम्ही हे बोलत आहोत. नाहीतर भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या यापुढे गृहीत धरू नये. असा इशारा ऊस नियंत्रण मंडळाचे पूर्व सदस्य विठ्ठल राजे पवार यांनी दिला आहे.

ऊस, दूध, बँका आणि शेतकऱ्याचे निगडित सहकारी संस्था ह्या राजकारणांचे अड्डे बनत असल्याचा संघटनेचा पूर्वीपासूनचा आरोप आहे. जे राज्यकर्ते सहकारी संस्था स्वतःच्या मालकीच्या बापाची मुजोरी असल्यासारखे वागत आहेत तो माज त्यांनी डोक्यात येऊ देऊ नये. सत्तेचा   ताम्रपट घेऊन कोणीही आलेला नसतो हे ज्याचे त्यांनी चांगले लक्षात ठेवावे. राज्यातल्या ऊस दूध आणि उत्पादक शेतकऱ्यांनी भल्या भल्यांची मस्ती उतरवलेली आहे तसा माज कुणी डोक्यात येऊ देऊ नये अन्यथा घोडे मैदान जवळ आलेलं आहे हे देखील राज्यकर्त्यांनी डोक्यात ठेवून शेतकऱ्यांच्या संस्थांकडे वाकडे नजरेने बघू नये असा इशाराही संघटनेने दिलेला आहे. सत्तेसाठी राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी सत्ताधारी ट्रिपल इंजिन सरकार सहकारी संस्थांचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य ऊस नियंत्रण मंडळाचे पूर्व सदस्य तथा शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी निपाणी कोल्हापूर येथे आज पत्रकारांशी बोलताना केला, ते बेंगलोर मार्गे पुण्याला येत असताना ते निपाणी येथे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी थांबले होते त्यावेळी राजे पवार बोलत होते. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते चहापानाच्या कार्यक्रमानंतर विठ्ठलाचे पवार हे कोल्हापूर मार्गे पुण्याला रवाना झाले असल्याची माहिती संघटनेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत नायकुडे यांनी प्रसिद्धीस दिलेला पत्रकात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या