सहकार महर्षि अभियांत्रिकीचा विद्यार्थी आमसिद्ध बिराजदार
सोलापूर विद्यापीठात दुसरा
वृत्त एकसत्ता न्यूज
अकलूज दिनांक 5ऑगस्ट 2024 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या बॅचलर ऑफ टेक्नोलॉजी च्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागाच्या तृतीय वर्ष परीक्षेच्या गुणवत्ता यादीत सहकार महर्षी शंकराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर-अकलूज चा विद्यार्थी आमसिद्ध बिराजदार विद्यापीठात दुसरा आला आहे. त्याने ८६.१८% गुण संपादन केल्याची माहिती काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. सचिन पांढरे यांनी दिली. विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते-पाटील, संस्थेचे सचिव राजेंद्र चौगुले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.

0 टिप्पण्या