रानभाजी - कडूभाजी

 

रानभाजी - कडूभाजी  

शास्त्रीय नाव : Deniella Repens

इंग्रजी नाव : Creepin Dentell

कुळ : Rubiaceae

वृत्त एकसत्ता न्यूज 

संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 28/8//2024 :

औषधी गुणधर्म  : या भाजीची पाने ताप, दमा, दाह, उचकी, मूळव्याध यात गुणकारी आहे. मधुमेहात या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.

पाककृती-१ : # साहित्य : कडूभाजी, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसूण, जिरे, तिखट, मीठ, हळद, टमाटे, कोथिंबीर. # कृती : एक पातेले घेऊन त्यात एक ग्लास पाणी व खुडलेली भाजी उकळून घ्यावी. नंतर त्यातील पाणी नितळून घ्यावे. नंतर एक पातेले घेऊन त्यात पाहिजे तेव्हढे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसूण, जिरे, तिखट, मीठ, हळद, टमाटे टाकून तळून घ्यावे. नंतर त्यात भाजी टाकून शिजू द्यावे. नंतर त्यात कोथिंबीर टाकावी. अशा प्रकारे आपल्या आवडीची पौष्टिक नि स्वादिष्ट भाजी तयार होईल.

पाककृती-२ : या भाजीची व्हिडियो पाककृती खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून बघावी.

https://youtu.be/mmJqNMB3YI?si=m4NQ5_tMRCD1Txp0

संदर्भ : महाराष्ट्र शासन/कृषी विभाग

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या