खोत 卐 गावडे शुभविवाह थाटाने संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 6 ऑगस्ट 2024 : वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय समन्वयक श्री सखाराम काशिनाथ खोत यांची पुतणी व कै. अनिल काशिनाथ खोत राहणार पळसदेव (काळेवाडी नंबर 1), तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांची द्वितीय कन्या चि.सौ.कां. तेजस्विनी आणि श्री बाळासाहेब दादाराम गावडे यांचे पुतणे व श्री तानाजीराव दादाराम गावडे राहणार पारवडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांचे चिरंजीव करण यांचा शुभविवाह मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1 वाजून 53 मिनिट या मुहूर्तावर अत्यंत थाटाणे संपन्न झाला. वेंकटेश लॉन्स भिगवन (चौफुला) तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे अत्यंत थाटात संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यास भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, भाजप युवा नेते राजवर्धन हर्षवर्धन पाटील, WDSO संस्थापक अध्यक्ष बबनराव आटोळे, वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय सल्लागार समिती राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे (महाराष्ट्र प्रदेश संपर्क व प्रदेश प्रसिद्धी प्रमुख, नॅशनल युनियन ऑफ बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली अर्थात एन.यु.बी.सी.), WDSO चे सेक्रेटरी अजय गाढवे, सल्लागार समितीचे सदस्य किसनराव आटोळे, पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सतीश खोमणे, उद्योजक संग्राम सोरटे, दादासाहेब चौरे, गणपतराव कोकणे (आयुक्त पुणे), सुनील भगत, ॲड. गुलाबराव गावडे, माऊली चौरे, ॲड. महेश देवकाते, सामाजिक कार्यकर्ते उपोषणकार चंद्रकांत वाघमोडे, मुंबईचे उपयुक्त नितीनराव काळे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी उपस्थित राहून नववधूवरांना शुभाशिर्वाद दिले. समस्त खोत (येडे) परिवाराच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सन्मान करण्यात आला.
0 टिप्पण्या