पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त चांदज येथे अग्निहोम सोहळा संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 5ऑगस्ट 2024 :
श्री सोमेश्वर दरबार चांदज (तालुका माढा, जिल्हा सोलापूर) येथे श्रावणातील पहिल्या सोमवारी अग्निहोम सोहळा संपन्न झाला. या दरबाराचे अग्निहोम सोहळ्याचे हे चौदावे वर्ष असून दरबार मध्ये अनेक वेळा सर्परूप दर्शनाचा लाभ झालेला आहे. श्री सोमेश्वर दरबारात श्री सोमेश्वर महात्म्य ग्रंथ पारायण सह शांतवन आणि अग्नी होम प्रज्वलन प्रचारक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री सोमेश्वर दरबार चांदज चे सर्वेसर्वा आकाश महाराज लोंढे, भीमराव लोंढे, अशोक महाराज सरवदे, दिगंबर बाबर, दादा चंदनशिवे मोहिनी मधुकर गावडे, नाजुका कसबे महाराज, कविता जाधव इत्यादींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाप्रसादा नंतर सोमेश्वर दरबारामध्ये विणवण्यांचा कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये किसन गायकवाड, दीपक बाबर, विशाल भिसे, दिलीप लोखंडे, शरद कोळपे, परशुराम गाडे, शहाजी शिंदे, सुनील डावरे, राजू महाराज कुरवली, महादेव धाईंजे, लक्ष्मी धाईंजे, सत्यवान भोसले इत्यादींनी सहभाग नोंदविला.
0 टिप्पण्या