💢 सदगुरू गहिनीनाथ अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
🟣 सभासदांना 10% लाभांश जाहीर
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 27 ऑगस्ट 2024 : माळशिरस तालुक्यातील अकलूज मधील अग्रगण्य असलेल्या सदगुरू गहिनीनाथ अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळी च्या वातावरणात संपन्न झाली. सभासदांना 10% लाभांश जाहीर केला.
दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी सौभाग्य मंगल कार्यालय माळीनगर या ठिकाणी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रारंभी ज्येष्ठ सभासद रमेश पांढरे यांच्या हस्ते सद्गुरु गहिनीनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी बँकेचे चेअरमन डॉक्टर अरविंद खुशालचंद गांधी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की बँकेस चालू वर्षी 38 लाख 17 हजार इतका नफा झाला असून दहा टक्के लाभांश जाहीर करण्यात येत आहे. संस्थेच्या 35 कोटी रुपयांच्या ठेवी असून 18 कोटी 47 लाख इतके कर्जवाटप केले आहे. संस्थेचा नेट एनपीए झिरो टक्के आहे. याप्रसंगी संस्थेचे सभासद महादेव बंडगर यांनी विचारलेल्या प्रश्नांना चेअरमन अरविंद खुशालचंद गांधी यांनी समर्पक उत्तरे दिली. या वार्षिक सर्वसाधारण सभेस बँकेचे चेअरमन डॉ.अरविंद गांधी, व्हाईस चेअरमन ऍड. शिरीष फडे, बँकेचे संचालक प्रकाश पाटील, अजित गांधी, संन्मती सोनाज, डॉ.विठ्ठल कवितके, ऍड संजय दोशी, भरतेश वैद्य, निलेश गिरमे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार गोरे, बँकेचे मॅनेजर मनोज मंगरुळे सर्व कर्मचारी पिग्मी एजंट उपस्थित होते. कार्यक्रमाचे अहवाल वाचन बँकेचे सीनियर अधिकारी संजय कुलकर्णी यांनी केले. विषय पत्रिकेवरील सर्व विषय सर्व संमतीने मंजूर झाले. एडवोकेट संजय दोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
.jpg)
0 टिप्पण्या