राजीनामा ‼️

 राजीनामा ‼️ 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 26/9/2026 :

सगळा देश आज रागाने धुमसतोय. आपल्या मतांची चोरी करून जनमत नसलेल्यांना सत्तेत बसवण्याचा आरोप असलेल्या ज्ञानेश कुमारचा राजीनामा घेण्यासाठी आंदोलन सुरू करण्याचा काहीजणांनी इशारा दिलाय. 

...पण राजीनामा घेऊन साध्य काय होणार?

राजीनामा म्हणजे पद सोडणे. शिक्षा नाही. तपास नाही. दोषसिद्धी नाही. फक्त चेहरा बदलणे. धर्मेंद्र प्रधानसारखी एक हाफचड्डी जाऊन तिथं दुसरी हाफचड्डी येणं एवढंच. पण व्होटचोरी झाली असेल तर हे प्रकरण पेपर लीकपेक्षा कितीतरी मोठं आहे. देशाविरूद्धचा मोठा कट आहे. देशद्रोह आहे. फक्त राजीनामा मागणं हा यावरचा उपाय नाही.

....मतदारयादीत नेमके काय घोटाळे केले गेले? कुणाचे आक्षेप दाबले गेले? कुठले आदेश दोन आयुक्तांच्या माहितीशिवाय निघाले? याचं उत्तर राजीनाम्यानं मिळत नाही.

...आणि महत्त्वाचं म्हणजे, तीन वर्षांपूर्वी जोडलेलं 'कलम १६' तसंच रहाणार आहे !

काय आहे कलम १६??? आणि ते कसं जोडलं गेलं???

…व्होट चोरी करून अख्खा देश बरबाद करण्याचा जर कट रचला असेल तर ती लोकशाहीची हत्या आहे. कुठलीही ‘हत्या’ करण्याआधी प्लॅनिंग केलं जातं. कधी ना कधी हा कट उघडा पडला,चौकशी झाली तर काय याची सोय केलेली असते. असो. तर कलम १६ कायाय ते सांगतो… डिसेंबर २०२३ मध्ये विरोधकांना निलंबित करून घाईघाईत एक कायदा पास करून घेतला गेला होता. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांबाबतचा तो कायदा. त्यात नंतर जोडलेले कलम १६.

त्या कलमाचा अर्थ साधा आहे :

"आयुक्ताने अधिकृत कर्तव्य बजावताना केलेल्या कृती, निर्णय, बोलण्यावर न्यायालयात दिवाणी किंवा फौजदारी खटला चालवता येणार नाही. पद सोडल्यानंतरही हे कवच लागू राहते." आता बोला !

काय उपयोग आहे ज्ञानेशकुमारला हाकलून? निवडणुक आयोगातल्या दोन आयुक्तांचे आक्षेप सार्वजनिक होऊनही जर कायदाच खटला थांबवत असेल, तर संविधानातली 'अकाऊंटेबिलीटी' कशी टिकेल???

म्हणून आंदोलन फक्त 'राजीनामा द्या' यासाठी नाही, तर... राजीनामा झाल्यावर तपास झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे,

कलम १६ रद्द करायला पाहिजे !

त्यामुळं अभिजीत दिपके म्हणतोय तसे आंदोलन तर करूयाच… ‘नीम का पत्ता कडवा है’, ‘चार चवन्नी घोडे पे’ या देशाच्या लोकप्रिय घोषणा तर देऊयाच. पण राजीनाम्यासोबत व्यवस्थेचा हिशोब मिळाल्याशिवाय पाऊल मागे नको घ्यायला.

…म्हणूनच ज्ञानेशला माफीचा साक्षीदार करून मूळ खुन्यांपर्यंत पोहोचण्याचा राहुल गांधींचा मार्ग जास्त ‘तर्कनिष्ठ’ वाटतो मला. 

हा लढा आता या देशाच्या आणि संविधानाच्या अस्तित्वाचा आहे.

जय संविधान

 किरण माने.

======//=====


"

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या