श्री गणेशाचे आगमन
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 15/9/2026 :
कालपासूनच बाप्पाच्या आगमनाच्या तयारीमुळे घरातील वातावरण खुप प्रसन्न आणि मंगलमय झालय. खरचं गणपती ,गौरी आणि नवरात्र हा मंगल सणांचा काळ खुप उत्साहाचा आल्हादकारक वाटतो. सणावरांच्या निमीत्त्याने का होईना आम्ही नोकरदार बायका देवासमोर चार घटका जरा शांत बसतो. नैवेद्य कुळाचार ह्या निमित्ताने चार निरनिराळे साग्रसंगीत पदार्थ करतो, ह्या निमीत्त्यानेच आपल्या कडून रितीरिवाज, नेमधर्म पाळल्या जातात. चार माणसे, नातलग आपले नेहमीचे रुटीन बदलवून गौरीगणपतीच्या निमीत्त्याने एकत्र येतात. ही एकमेकांची मनं जुळण्यासाठी, एकमेकांचा सहवास लाभण्यासाठीच जणू ह्या सणावारांच नियोजन असतं. परस्परांशी एकोप्याने वागणे आणि जमेल तितकी मदत करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. त्यामुळें ह्या दिवसात कामाची खुप जास्त धांदल असूनही आम्हा बायकांची अजिबात चिडचिड होत नाही. सगळं कसं मनापासुन करावस वाटत.
आता दहा दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेलच जणू. दुर्वा, लाल फुल व्हायलेली ती हसरी, प्रसन्न, आश्वासक गणरायाची मुर्ती खुप चैतन्य देते. उकडीचे , तळणीचे मोदक ह्या उत्सवाचे खास वैशिष्ट्य. त्या जोडीला आता व्हरायटी म्हणून चॉकलेट मोदक, खवा मोदक, पुरणाचे मोदक पण हल्ली प्रसाद म्हणून ठेवायची प्रथा आलीय. गणपती जवळ पाच प्रकारची फळे, मक्याचे कणीस, काकडी ठेवायची प्रथा असते. पितांबर नेसलेली, गळ्यात जानवे, हातात मोदक, चेहऱ्यावर हलके मिस्किल स्माईल, माथ्यावर लाल फुल, दुर्वा आणि साथीला आपले इटूकले, पिटुकले मुषकराज, अशी बाप्पाची मूर्ती खूप लोभसवाणी आणि चैतन्याची पखरण करणारी असते.
कल्याणी बापट (केळकर) 9604947256
बडनेरा, अमरावती
0 टिप्पण्या