संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे "साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे आदर्श पत्रकार पुरस्कार 2026" ने सन्मानित

 


संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे "साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे आदर्श पत्रकार पुरस्कार 2026" ने सन्मानित 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 01/08/2026 :

साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, लहुजी साम्राज्य अकलूज आणि नवनाथ (भाऊ) साठे मित्रपरिवार अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अकलूज येथील स्मारका नजीक  त्यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या भव्य समारंभामध्ये अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांना "साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे आदर्श पत्रकार पुरस्कार 2026" ने सन्मानित करण्यात आले. 


माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह हिंदुराव नाईक - निंबाळकर आणि माळशिरस तालुका विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राम विठ्ठल सातपुते यांच्या हस्ते आयोजक नवनाथ साठे यांचे सह मान्यवरांच्या उपस्थितीत हा आदर्श पत्रकार पुरस्कार बहाल करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या