विजयकुमार कुबेर मोटे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या कोषाध्यक्षपदी निवड

 

विजयकुमार कुबेर मोटे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या कोषाध्यक्षपदी निवड

वृत्त एकसत्ता न्यूज

पंढरपूर तालुका प्रतिनिधी प्रशांत माळवदे 

 पत्रकारिता क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असलेले  वाळूज ता. मोहोळ येथील पत्रकार विजयकुमार कुबेर मोटे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या राज्य कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महासंघाच्या नुकत्याच पार पडलेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.

विजयकुमार मोटे हे “मोहोळ न्यूज”च्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न, सामाजिक विषय आणि सर्वसामान्यांच्या समस्यांना सातत्याने वाचा फोडत आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महासंघाने त्यांच्यावर राज्य कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.

त्यांच्या निवडीबद्दल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कांसाठी, कल्याणासाठी आणि संघटन मजबुतीसाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या निवडीबद्दल विजयकुमार मोटे यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानत पत्रकारांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली.

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ राज्य कार्यकारिणी : डॉ. समीर राजे (अध्यक्ष), दीपक चव्हाण  (उपाध्यक्ष), राजेंद्र पवार (उपाध्यक्ष), अरुणकुमार मोटे (उपाध्यक्ष), विक्रम भोर (कार्याध्यक्ष), सुरजकुमार बागडे ( महासचिव), विजयकुमार कुबेर मोटे (कोषाध्यक्ष),  गिरीश वालवी (राज्य सचिव), विठ्ठल तांबे (जनसंपर्क प्रमुख), विजयकुमार हरिश्चंद्रे ( राज्य संघटक), सागर पवार (सहाय्यक जनसंपर्क प्रमुख),  नवनाथ खिलारे ( सहाय्यक जनसंपर्क प्रमुख), मंगेश फडाले ( सहाय्यक संघटक), मोहम्मद मुलाणी ( कार्यालय सचिव),

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या