ज्योतीराम भुसारे याची प्लेसमेंट द्वारे पुण्यातील कंपनीत निवड


ज्योतीराम भुसारे याची प्लेसमेंट द्वारे पुण्यातील कंपनीत निवड

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 28/04/2026 :

शिवरत्न नॉलेज सिटी यशवंतनगर अकलूज या महाविद्यालायमध्ये झालेल्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये  सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कॉम्पुटर पदवी अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षामध्ये शिकत असणाऱ्या ज्योतीराम भुसारे ज्योतिराम याची ट्रेनिसॉफ्टवेअर इंजिनियर वी टेक सोल्युशनया पुणे या  कंपनीने घेतलेल्या मुलाखती मध्ये निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली. 

सदर निवडी बद्दल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालयाच्या विकास समिती अध्यक्षा कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, यांनी अभिनंदन केले. 

या प्रक्रियेमध्ये सिविल पदवी अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.सचिन पांढरे व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. संगीतराव पी. वाय. यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या