सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची “वर्टिगेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड.” पुणे येथे निवड
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 04/04/2026 :
सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दिनांक 28/3/2026 रोजी ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या “वर्टिगेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड” पुणे या आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामधील डिप्लोमा मेकॅनिकाल विभागातील अंतिम वर्षामध्ये शिकत असणाऱ्या चि. प्रशांत मोरे, कु. श्रेया म्हेत्रे, कु. तन्वी रडे, चि. ज्ञानेश्वर झिंजुर्डे , कु.क्रांती एकतपुरे, कु.चंदना लोकरे, कु. दिपाली जाधव, कु. श्रद्धा सावंत व तसेच इलेक्ट्रीकल डिप्लोमा विभागातील, कु. समृद्धी कुलकर्णी, कु.रसिका भादुले, राजवर्धन सुरवसे व संजय जाधव या विद्यार्थ्यांची “वर्टिगेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड” पुणे या नामांकित कंपनी मध्ये निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली. सदर निवडी बद्दल ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालयाच्या विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी अभिनंदन केले.
मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा.स्वप्निल निकम, इलेक्ट्रीकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा.सागर कांबळे आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. संगीतराव पी. वाय. यांनी काम पाहिले.

0 टिप्पण्या