बाळासो शिंदे आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित
वृत्त एकसत्ता न्यूज
माळशिरस प्रतिनिधी : माळशिरस तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठीचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार चाकोरे शाळेचे मुख्याध्यापक बाळासो शिंदे यांना यांना मिळाला. माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर व पंचायत समिती सभापती दत्ता मगर यांचे हस्ते व उपसभापती मनीषा पाटील, जि प सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचे उपस्थितीत सदरहू पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.गत चार वर्षांमध्ये मुख्याध्यापक पदभार स्वीकारल्यापासून शिंदे यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने माजी विद्यार्थी,ग्रामस्थ व विविध संस्थांच्या सीएसआर फंडाच्या मदतीतून शाळेचा चेहरा मोहराच बदलला. सहकारी शिक्षकांना विश्वासात घेऊन शाळेची उत्तरोत्तर प्रगती केली.शाळेच्या भौतिक सुविधा शैक्षणिक सुविधा या सर्वच स्तरावर त्यांनी सतत पाठपुरावा करून त्या सर्वच गरजांची पूर्तता करून शाळेचे एका स्वच्छ सुंदर शाळेत रूपांतर केल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन विविध उपायोजना करून शाळेची गुणवत्ता वाढवली. क्रीडा स्पर्धा, टॅलेंट हंट स्पर्धा,स्पर्धा परीक्षा व शासन स्तरावरील विविध शालेय उपक्रम यामध्ये शाळेचे नाव आघाडीच्या शाळांमध्ये समाविष्ट केले.शाळेच्या विकासासाठी जवळजवळ आठ ते नऊ लाखाचा निधी लोकवर्गणीतून जमवला. यासाठी त्यांना ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील एक उत्कृष्ट व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असलेली शाळा म्हणून चाकोरे शाळेचा नेहमीच गौरव केला जातो.अशा या आदर्श शाळेच्या मुख्याध्यापकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला ही चाकोरे शाळेच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे असे नागरिकांतून बोलले जात आहे.

0 टिप्पण्या