विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक : 02/01/2026
शालेय जीवनात आपले व्यक्तिमत्व घडते. आपला *व्यक्तिमत्व विकास* व्हावा म्हणून आपले पालक व शिक्षक प्रयत्नशील असतात. व्यक्तिमत्व विकास म्हणजे नेमके काय? हा प्रश्न या वयात सारखा भेडसावत असतो.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, व्यक्तिमत्व विकास करणे हा शिक्षणाचा मूळ हेतू असतो. पुस्तकी ज्ञाना व्यतिरिक्त यशस्वी जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी, जी मूल्ये जीवनात असावी लागतात, ती रुजवणे म्हणजे व्यक्तिमत्व विकास करणे.
मुलांनो, सकारात्मक विचारसरणीतून, दुसऱ्याचे भले चिंतनारी, भले करणारी वैचारिक कृती करणे ज्याला जमते तो चांगला घडला, त्याचा चांगला विकास झाला असे समजले जाते.
स्वतःला घडवा, समाज घडवा!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या