मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक : 02/01/2026

समाजात वावरताना अनेक लोकांशी आपला संबंध येतो. त्यांच्यातील काही गोष्टी आपल्याला आवडतात तर काही खटकतात. आपल्याही बाबतीत तसेच असते. आपले काही गुण लोकांना आवडतात तर काही खटकतात.

आपल्यात सुधारणा घडवून आणायची असेल तर आपणच प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याला खटकणाऱ्या आपल्यातील उणिवा आपण दूर करण्याचा प्रयत्न करू. 

व्यक्तिमत्व विकास म्हणजे दुसरे तिसरे काही नसून उणिवा दूर करणे म्हणजेच आपल्यातील त्रुटी दूर करणे. त्यासाठी आपणच प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात. आपल्यातील सकारात्मक बदल म्हणजेच विकासाच्या दृष्टीने पडलेले पाऊल.

आजचा संकल्प

आपण प्रत्येकजण समाजातील घटक आहोत. आपले गुण-दुर्गुण सामाजिक चारित्र्य ठरवते. त्यासाठी आपण सर्वजण चारित्र्य संवर्धनाचा प्रयत्न करू व समाजाला एक योग्य दिशा देऊ.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या