सहकार महर्षि कारखान्यामध्ये ५ लाख २५ हजार व्या साखर पोत्याचे व २ कोटी ८५ लाख वीज विक्री युनिटचे पूजन संपन्न

 

सहकार महर्षि कारखान्यामध्ये ५ लाख २५ हजार व्या साखर पोत्याचे व २ कोटी ८५ लाख वीज विक्री युनिटचे पूजन संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 09/01/2026 :

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे सन २०२५-२०२६ च्या गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेल्या ५ लाख २५ हजार व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे संचालक विराज प्रकाश निंबाळकर यांचे शुभहस्ते व सहवीज निर्मिती प्रकल्पामधून महावितरण कंपनीस विक्री केलेल्या २ कोटी ८५ लाख वीज विक्री युनिटचे पूजन कारखान्याचे संचालक महादेव जालिंदर क्षिरसागर यांचे शुभहस्ते संपन्न झाले.

कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटीलसाहेब यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-  पाटीलसाहेब यांचे नेतृत्वाखाली तसेच कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रगतशील दृष्टीकोनातून कारखान्याची वाटचाल प्रगतीपथावर चालू आहे.

कारखान्याचा गळीत हंगाम २०२५-२०२६ दिनांक ०१/११/२०२५ रोजी सुरु झाला असून  आज अखेर ५ लाख ९६ हजार १९१ मे. टन ऊसाचे गाळप होऊन ५ लाख ४८ हजार ४५० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले आहे. त्यामध्ये सरासरी साखर उतारा १०.८३% मिळाला आहे. सध्या प्रतिदिवस ८,५०० मे.टन प्रमाणे ऊसाचे गाळप चालू आहे.

या सिझनमध्ये को-जन वीज निर्मिती प्रकल्प दिनांक २५/१०/२०२५ रोजी सुरु झाला असून दि.०८/०१/२०२६ अखेर ४ कोटी ६८ लाख ५८ हजार ०६० युनीट वीज निर्मिती झाली असून त्यामधुन २ कोटी ८६ लाख २७ हजार ८०० वीज युनिट विक्री केली असलेची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी यावेळी दिली.

सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख तसेच संचालक लक्ष्मण शिंदे, रावसाहेब मगर, रामचंद्र सिद, रावसाहेब पराडे, डॉ.सुभाष कटके, रामचंद्र ठवरे, कार्यलक्षी संचालक जयवंत माने-देशमुख तसेच शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी सदस्य विनायक केचे, राजेंद्र भोसले, धनंजय सावंत, नामदेव चव्हाण, धनंजय दुपडे, अनिलराव कोकाटे, श्रीकांत बोडके, सौ. हर्षाली निंबाळकर तसेच माजी संचालक भिमराव काळे, भारत फुले, मोहनराव लोंढे, रामचंद्र चव्हाण, राजेंद्र मोहिते, धनंजय चव्हाण, चांगदेव घोगरे व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

सदर साखर पोती पुजन प्रसंगी कारखान्याचे संचालक  विराज प्रकाश निंबाळकर यांचे स्वागत चिफ इंजिनिअर एस. के. गोडसे यांनी केले व सत्कार चिफ केमिस्ट एस.एन.जाधव यांनी केला. व को-जन वीज विक्री युनिट पूजन प्रसंगी संचालक महादेव जालिंदर क्षिरसागर यांचा सत्कार को-जन मॅनेजर वाय. के. निंबाळकर यांनी केला. (फोटो- अतुल बोबडे (शिवकिर्ती फोटो स्टुडिओ)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या