मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : भाग्यवंत ल. नायकुडे,

अकलूज दिनांक 13/01/2026 :

विचारांची समृद्धता आपले व्यक्तिमत्व घडवते. सतत सद्विचार ऐकून व वाचून आपल्यातही सद्विचार जागृत होतात. सभोवताली सतत सद्वर्तन पाहून, सदगृहस्थांच्या सानिध्यात राहून आपल्यावर न कळत चांगले संस्कार होतात.

संगत चांगली असावी असे म्हटले जाते, त्या मध्ये खूप तथ्य आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत की बालपणापासून संत संगत असेल तर फक्त बोलणे व वागणेच नाही तर खाण्या-पिण्याच्या सवयी सुद्धा चांगल्याच लागतात. तामसी वृत्ती, चिडखोर-संतापी, विकृत स्वभाव असलेले लोक आसपास असतील तर नक्कीच विचार दूषित होतात, भाषा बदलते, वागण्यात, स्वभावात नकारात्मक गुण दिसू लागतात.

आजचा संकल्प

स्वतःच्या बुद्धीचा कोणाला ताबा घेऊ न देता, बुद्धीवर व मनावर नियंत्रण ठेवून, संगत गुण न घेता सकारात्मक व संस्कारी वागू व स्वतःचे व्यक्तिमत्व घडवू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या