श्री शंकर स. सा. कारखाना गळीत हंगामातील पहिल्या साखर पोत्याचे पूजन संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 02/11/2025 :
सदाशिवनगर (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील श्री शंकर सहकारी साखर कारखाना सन 2024-25 च्या गाळप हंगामातील उत्पादित झालेल्या पहिल्या साखर पोत्याचे पूजन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
कारखाना कार्यस्थळी संपन्न झालेल्या या सोहळ्याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, व्हॉईस चेअरमन मिलींद कुलकर्णी , माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीच्या सभापती सौ वैष्णवीदेवी मोहिते पाटील, युवा नेते विश्वतेजसिंह मोहिते- पाटील, राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाअध्यक्ष देवीदास ढोपे,कारखान्याचे माजी संचालक संजय कोरटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब रुपनवर, लक्ष्मण पवार, जगनाथ जाधव,सचिन सांळुखे, अनंतलाल दोशी,अभिमान सावंत, शिवाजी गोरे, रामदास कर्णे , सुधाकर पोळ, महादेव शिंदे, सुनिल माने, दादासाहेब वाघमोडे पाटील, विजय खराडे, सचीन लोकरे,विष्णु घाडगे, संतोष महामुनी, बिनु पाटील, नाना शेंडे, ॲड चंद्रकांत शिंदे, भोजराज माने, शिवराज निबाळकर, युवराज देशमुख, लालासाहेब फडतरे, नाना मोहिते, संतोष शिंदे,हुसेन मुलाणी, जगनाथ राजमाने, ज्ञानेश राऊत, एकनाथ वाघमोडे, लालखान पठाण, कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख, अभिजित डुबल, अधिकारी, कामगार ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या