🔥शहीद निवृत्ती जाधव यांच्या स्मृतिदिनी देशभक्तीची ज्योत पुन्हा प्रज्वलित!
🟠 शहीद निवृत्ती जाधव यांचा स्मृतिदिनी विविध उपक्रमांनी साजरा
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 06/10/2025 :
देशासाठी प्राणार्पण करणारे शहीद पोलीस इन्स्पेक्टर निवृत्ती जाधव (सीआरपीएफ) यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या श्रीपूर येथील स्मारकस्थळी विविध उपक्रमांच्या माध्यमातून देशभक्तीच्या भावपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी देशभक्तीचा उत्साह अनुभवला.
स्मृतिदिनानिमित्त सकाळी वीरपत्नी सुरेखा जाधव यांच्या शुभहस्ते शहीद जवान ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांचा आणि ग्रामस्थांचा सहभाग असलेली श्रीपूर–महाळुंग परिसरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली. “शहीद निवृत्ती जाधव अमर रहे!” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. स्मारकावरील पुतळ्याला मान्यवरांनी सलामी देऊन श्रद्धांजली वाहिली.
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. एम. के. इनामदार म्हणाले, “मरावे परी कीर्तिरूपी उरावे, असे प्रेरणादायी कार्य शहीद निवृत्ती जाधव यांचे आहे. त्यांनी केलेली देशसेवा युवकांसाठी सदैव मार्गदर्शक ठरेल.”
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना खाऊ वाटप करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना शहीद निवृत्ती जाधव स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पोलीस सेवेतील विशेष कामगिरीबद्दल अकलूज पोलीस स्टेशनचे पीआय नीरज उबाळे, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासाठी हनुमंत मोरे व सुनील पातळे, तर प्रभागातील विकास कार्यासाठी नगरसेविका तेजश्री लाटे यांना गौरविण्यात आले. तसेच प्रा. अमोल बंडगर, वेटलिफ्टर ऋतुजा जाधव, आणि वीरमाता मस्केआजी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अकलूज पोलीस पोलीस स्टेशनचे एपीआय विक्रम साळुंखे, सीआरपीएफचे पीएसआय-एस पी शिंदे, महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी चव्हाण, नगरसेविका शारदाताई पाटील, नगरसेविका तेजश्री लाटे, नगरसेवक प्रकाश नवगिरे, शाळा संस्थेचे अध्यक्ष डॉ.रामदास देशमुख, प्राचार्य पांडुरंग बनसोडे, महाळुंग मंडल अधिकारी शरद खंडागळे, उद्योजक रोहित काळे, त्रिदल संघटनेचे अध्यक्ष सुरेश तोरसे, लक्ष्मण माने, राजेंद्र आढाव, ब्रिमा सागरचे नरेश पाठक, भागवत साहेब, मौला पठाण, पै.अशोक चव्हाण, राजेंद्र वाळेकर, विक्रम लाटे, प्राचार्य तय्यब डांगेसर, कवयित्री नूरजहा शेख, सुरक्षा अधिकारी भागवत पारसे, शांतीलाल रेडे, दादासाहेब माने, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री चंद्रशेखर विद्यालयाचे प्रा.सुनील गवळी, सिताराम गुरव, मुख्याध्यापिका सुरेखा अनिल जाधव , केचे , धाराव , शंकर यादव, सर्व अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, वीरपत्नी सुरेखा जाधव, संस्थेचे संचालक धर्मेश जाधव, प्रेरणा जाधव, सारिका नाईकनवरे, सविता नाईकनवरे, कांचन देवडकर, राजू जाधव, पवन नाईकनवरे, स्वाती पारसे, दत्ता नाईकनवरे, रवींद्र नाईकनवरे, आदित्य जाधव, अनुराग नाईकनवरे, शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान व बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती सावंत यांनी केले व आभार सारिका नाईकनवरे यांनी मानले.



0 टिप्पण्या