डाॅ.प्राजक्ता मोहन काशिद यांना डाॅक्टरेट पदवी.

 

डाॅ.प्राजक्ता मोहन काशिद यांना डाॅक्टरेट पदवी.

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 18/10/2025 : अकलूज येथील डॉ.प्राजक्ता मोहन काशीद यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथून मानसशास्त्र विषयामध्ये डाॅक्टरेट पदवी मिळवली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षांव होत आहे.

त्यांनी "A psychological study of achievement motivation and some personality factors of teenagers using social media".या विषयावर प्रोफेसर डॉ.पी.एस.बनसोडे हेड ऑफ द डिपार्टमेंट सायकॉलॉजी संगमेश्वर स्वायत्तत्त महाविद्यालय सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली मानसशास्त्र संशोधन केंद्रातून पूर्ण केले.त्यांनी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या मौखिक परीक्षेनंतर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती पदवी घोषित करण्यात आली.यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मॉडर्न कॉलेज येथे कार्यरत असलेल्या डॉ.साधना नातू आणि प्रा.डॉ.वसंत कोरे चेअरमन,विद्याशाखेचे अधिष्ठाता हे बाह्य परीक्षक म्हणून उपस्थित होते.डाॅ.प्राजक्ता काशिद यांनी त्यांचे वडील कै.मोहन काशिद यांचे मुलीने डाॅक्टरेट व्हावे हे स्वप्न होते ते आज मुलीने पुर्ण केले आहे.त्या सध्या डॉ.प्राजक्ता काशिद या MIT  विश्वशांतीगुरुकुल स्कूल कोथरूड येथे विद्यार्थी समुपदेशक (Student Counselor) म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या पीएचडीमध्ये पती सोमनाथ क्षीरसागर यांची मोलाची साथ आणि मार्गदर्शन लाभले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या