काँग्रेसचे नूतन तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांचे वज्राई देवीला साकडे
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 04/10/2025 :
वज्राई तांबवे (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) येथे वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन काँग्रेस पक्षाचे नूतन तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांनी देवीला साकडे घातले की, "अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे जे नुकसान झाले आहे त्यासाठी सरकारने तातडीने हेक्टरी 50 हजार रुपये द्यावेत. सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी. शेतकरी राजा सुखी होऊदे तसेच माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपरिषद वर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी आशीर्वादाचे बळ देऊन माळशिरस तालुका काँग्रेस मय करण्यासाठी टाकद दे. असे साकडे देवी समोर घातले त्यावेळेस पत्रकार भाग्यवंत ल. नायकुडे, राहुल कुंभार उपस्थित होते.
शनिवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी माळीनगर सवतगाव आणि वज्राई तांबवे या गावी जनसंपर्क साधत असताना माळशिरस तालुका काँग्रेस अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांनी पुरातन आणि जागृत देवस्थान वज्रेश्वरी मंदिर येथे थांबून वजराई मातेचे आशीर्वाद घेतले.


0 टिप्पण्या