🟡 ग्रामपंचायत मोटेवाडी येथे काँग्रेसचे संपर्क अभियान संपन्न
🟢 मोटेवाडी ग्रामपंचायत साठी स्वतंत्र ग्रामविकास अधिकारी असावा अशी आग्रहाची मागणी
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 06/10/2025 : ग्रामपंचायत मोटेवाडी कार्यालय (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथे काँग्रेसचे संपर्क अभियान संपन्न झाले. ग्रामपंचायत सरपंच, ग्रामविकास अधिकारी, सदस्य आणि नागरिक यांची माळशिरस तालुका काँग्रेस अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांनी आज सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता काँग्रेस संपर्क अभियानांतर्गत सदिच्छा भेट घेतली. यावेळी शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघ आणि नॅशनल युनियन ऑफ बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली अर्थात एन. यु. बी. सी.चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, संपर्क व प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, सदाशिवराव निवासी प्रशाला चांदापुरी चे प्राचार्य राजेश किसन वायदंडे, राजीव गांधी पंचायती राज संघटन सोलापूर जिल्हा अध्यक्ष रमेश अंकुश नामदास, नवनाथ मोटे, नाना वायदंडे, धनाजी अवघडे, दादा नामदास, विठ्ठल वायदंडे इत्यादींसह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे शेतकरी शेतमजूर, कष्टकरी आणि नागरिक यांचे झालेले नुकसान व त्याचे पंचनामे, पदवीधर मतदार संघ तसेच शिक्षक मतदार संघासाठी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्या बाबत, ज्येष्ठ नागरिक, निराधार, विधवा, परित्यक्ता, अपंग इत्यादींसाठी विविध शासकीय योजनांचे लाभार्थ्यांकडून फॉर्म भरून घेणे इत्यादी बाबत चर्चा विचारविनिमय झाला. मोटेवाडी ग्रामपंचायत साठी स्वतंत्र ग्रामविकास अधिकारी असावा अशी आग्रहाची मागणी यावेळी पुढे आली.
प्रारंभी मोटेवाडी ग्रामपंचायत सरपंच सतीश रामचंद्र शेंडगे आणि ग्रामविकास अधिकारी बी.एम. होळ यांच्या हस्ते तालुकाध्यक्ष गिरीश शेटे आणि एन. यु. बी. सी. चे प्रदेश उपाध्यक्ष भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचा सत्कार करण्यात आला.


0 टिप्पण्या