🔰"ओंकार साखर कारखाना उच्चांकी दराची परंपरा कायम ठेवणार"- बाबुरावजी बोत्रे पाटील
🔵 ६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 29/10/2025 :
ओंकार साखर कारखाना चांदापुरी (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) च्या ६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ रायगड जिल्हा बॅंकेचे चेअरमन जयंत पाटील, ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुरावजी बोत्रे पाटील, अर्बन बँकेच्या चेअरमन सुप्रिया पाटील, संचालिका रेखाताई बोत्रे पाटील यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकुन करण्यात आला. या वेळी बोलताना बोत्रे पाटील म्हणाले की मी शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांच्या काय अङचणी आहेत याची जाणीव मला आहे त्यामुळेच ओंकार साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे हित ङोळ्यासमोर ठेवुन ऊसाला गेल्या पाच वर्षीपासुन सर्वात जास्त दर दिला. 2025 - 2026 सिझनला दर सर्वोत्तम राहिल आशी ग्वाही बोत्रे पाटील यांनी दिली.
जयंत पाटील म्हणाले की ओंकार साखर कारखाना परिवाराने बंद अवस्थेत असणारे साखर कारखाने चालु करून शेतकऱ्यांना सर्वात जास्त बाजार भाव देऊन वेळेत ऊस बीले दिली. लाखो हातांना काम दिले व भागाचा कायापालट केला ही बोत्रे पाटील यांची कौतुकास्पद कामगिरी आहे. गत वर्षी च्या ऊसास रु. 3005/- दर दिल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने बोञे पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी अर्बन बॅकेच्या चेअरमन सुप्रिया पाटील ओंकार च्या संचालिका रेखाताई बोत्रे पाटील, चांदापुरी सरपंच जयवंत सुळ, जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे, केन मॅनेजर शरद देवकर, तरंगफळचे सरपंच नारायण तरंगे, निमगाव चे माजी सरपंच हनुमंत पवार, जवाहर शिक्षण प्रसारक मंङाळाचे उपाध्यक्ष महादेव मगर, सर्जेराव पवार, प्रकाश पवार, रावसाहेब तरंगे, दत्ता मगर, प्रकाश मगर, नितीन जाधव, सर्जेराव पिंगळे, यासह बहुसंख्य शेतकरी, वाहन धारक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावता शिंदे, निलेश गुरव, रमेश औताङे, सर्जेराव कचरे, यांनी परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या