माळशिरस तालुक्यात काँग्रेसच्या दैनंदिन वाढत्या सक्रियतेची चर्चा
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 04/10/2025 : माळशिरस तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढीच्या दृष्टिकोनातून व तालुक्याची कार्यकारणी तयार करण्याच्या उद्देशाने नूतन तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांनी माळशिरस तालुक्यातील गावोगावी जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे. यामध्ये काँग्रेसचे सर्व आजी-माजी पदाधिकारी तसेच समविचारी सहयोगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा विनिमय करीत आहेत. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायती इत्यादींच्या निवडणुकीची रणनीती काय असावी याबाबतही चर्चा करण्यात येत आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात येत आहेत. बँक, मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह संस्था इत्यादींना सदिच्छा भेट देत सुशिक्षित बेरोजगार यांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी जाचक नियम अटींमध्ये शिथिलता आणून अर्थ सहाय्य करण्याबाबत चर्चा केली जात आहे. यासाठी सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांनाही काँग्रेस पक्षाची भूमिका कशी योग्य आहे यावरही हितसंवाद घडून येत आहेत.
आज शनिवार दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी माळीनगर, सवतगाव, वज्राई तांबवे इत्यादी गावांचा जनसंपर्क दौरा अतिशय उपयुक्त आणि प्रेरक ठरल्याचे तालुकाध्यक्ष गिरीश शेटे यांनी सांगितले.
माळीनगर व सवतगाव येथील जनसंपर्क मोहीम प्रसंगी माळशिरस तालुका काँग्रेस माजी अध्यक्ष शिरीष ताराचंद फडे, सवतगाव ग्रामपंचायत उपसरपंच अर्जुन प्रल्हाद बंडगर, अमर नजीर काझी, काँग्रेस माजी तालुका उपाध्यक्ष संजय महिपती दळवी, मुस्लिम समाज अध्यक्ष माळीनगर जब्बार अल्लाउद्दीन तांबोळी, वंचित बहुजन समाज जिल्हा कोषाध्यक्ष अभिमान जगताप, राहुल पोपट कुंभार, पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे इत्यादी प्रमुख मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वांच्या वतीने गिरीश शेटे यांचा सत्कार शिरीष फडे आणि अभिमान जगताप यांनी केला.



0 टिप्पण्या