🟢 "द्या साथ, मिळेल हात"- गिरीश शेटे
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 05/10/2025 : आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाला साथ द्यावी. "द्या साथ मिळेल हातात हात," आपण भक्कमपणे साथ द्या. काँग्रेस पक्षाचा पाईक बनवून आपल्या अडचणी सोडवीन असे माळशिरस तालुका काँग्रेस नूतन अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांनी म्हटले. झंजेवाडी खडूस (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) येथे रविवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी धनाजी श्रीपती मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत मध्ये ते बोलत होते.
प्रारंभी माळशिरस तालुका काँग्रेस अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळा स्मारक स्थळी पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय पिछडा वर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती एवं अल्पसंख्यांक महासंघ दिल्ली प्रदेश उपाध्यक्ष, संपर्क व प्रसिद्धी प्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, समाधान येळे, अजय वाघमोडे, सतीश तरंगे, सागर बोरकर, शिवाजी मस्के, नवनाथ मस्के, विश्वराज मस्के, विजय झंजे इत्यादी युवकां समवेत अन्य नागरिक उपस्थित होते.
या बैठकीमध्ये जिल्हा परिषद गट आणि तालुका पंचायत समिती गण यामध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवारां बद्दल इच्छुकांच्या नावांची चाचपणी करण्यात आली. पदवीधर नव मतदार नोंदणी, शेतीपूरक जोड व्यवसाय, लघुउद्योगांबरोबरच तत्सम विविध व्यवसाय, त्यांच्यासाठी बँकिंग क्षेत्रातून अर्थसहाय्य, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून छोटे मोठे व्यवसाय सुरू करणे इत्यादी विविध विषयांवर तालुका काँग्रेस नूतन तालुकाध्यक्ष गिरीश शेटे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. झंजेवस्ती ग्रामस्थांच्यावतीने तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गिरीश शेटे यांचा मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.


0 टिप्पण्या