मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 31/10/2025 :

आपल्या दैनंदिन जीवनात आपण नेहमी काही न काही मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतो. ज्ञान मिळवण्यासाठी काही प्रयत्नशील असतात तर धन मिळवण्यासाठी काही धडपड करत असतात. पद-प्रतिष्ठा यासाठी अनेकजण स्पर्धेत असतात.

ज्ञान कायम स्वरूपी राहते. पद, पैसा, प्रतिष्ठा या गोष्टी येतात अन् जातात. एकदा गेल्या तरी त्या परत मिळू शकतात. गेलेली वेळ मात्र परत मिळत नाही. गमावलेला विश्वास पुन्हा मिळत नाही.

काचेला तडा गेल्यावर जशी ती पूर्ववत होत नाही तशी एकदा बिघडलेली नाती परत पूर्ववत होत नाहीत. बोलण्यातून किंवा वागण्यातून झालेल्या गैरसमजामुळे नाती बिघडतात.

आजचा संकल्प

गेलेली वेळ, गमावलेला विश्वास व दुरावलेली माणसे आयुष्यात पुन्हा येत नाहीत हे लक्षात घेऊन वागण्या-बोलण्यात संयम ठेवू व जे आहे ते जपू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या