अकलूज पोलीस ठाणे यांचे वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांचे जयंतीनिमित्त "रन फॉर युनिटी" चे आयोजन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 30/10/2025 : अकलूज पोलीस ठाणे यांचे वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांचे 150 जयंतीनिमित्त उद्या दिनांक 31/10/2025 रोजी सकाळी 7.00 वाजता "मिनी मॅरेथॉन"ला विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथून सुरुवात होणार आहे.
दिनांक 31/10/2025 रोजी सकाळी 07.00 वाजता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त अकलूज पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित केलेल्या"रन फॉर युनिटी" या कार्यक्रमामध्ये अकलूज शहरातील सर्व नागरिकांनी, शालेय विद्यार्थी, डॉक्टर असोसिएशन, व्यापारी असोसिएशन (कापड व्यापारी सोने चांदी व्यापारी) मेडिकल असोसिएशन, किराणा असोसिएशन, सर्व संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, शिक्षक, नोकरदार वर्ग, नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी, पोलीस पाटील, पैलवान व व्यायाम प्रेमी यांनी वेळेवर उपस्थित राहुन कार्यक्रमात सहभागी व्हावे. असे जाहीर आवाहन अकलूज पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी केले आहे.


0 टिप्पण्या