अकलूज नगर परिषद निवडणूक उमेदवार चर्चा आणि सत्कार
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 09/10/2025 :
गांधी चौक, अकलूज येथील 1070 झोपडपट्टी रहिवासी यांच्या वतीने माळशिरस तालुका काँग्रेस अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांचा सत्कार करण्यात आला.
गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी गिरीष शेटे यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, अजय बाळू वाघमोडे, नागेश सुखदेव जाधव, बापू दत्तू मोहिते, गणेश सुनील साळुंखे, आयान सय्यद, प्रेम मारुती बोडरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अकलूज नगरपरिषद निवडणुकीत प्रभागवार इच्छुक उमेदवारांची यावेळी चर्चेतून चाचपणी करण्यात आली.
वाढदिवस संपन्न
सत्कारानंतर समतानगर अकलूज येथील रहिवासी अविनाश उत्तम जगताप यांच्या 32 व्या वाढदिवसा निमित्त गिरीष शेटे यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देत वाढदिवस केक कापण्यात आला. याप्रसंगी ॲड. शरफू मलिक शेख, पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनीही यांनीही अविनाश जगताप यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन निलेश पगारे यांनी केले.


0 टिप्पण्या