काँग्रेस तालुकाध्यक्ष गिरीश शेटे यांची दि शिवसमर्थ मल्टीस्टेट शाखेस सदिच्छा भेट
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 03/10/2025 : दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, तळमावले जिल्हा सातारा या संस्थेच्या माळशिरस शाखेस माळशिरस तालुका काँग्रेस अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांनी आज (दि. 3) रोजी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या समवेत जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब आप्पासाहेब मगर, रमेश नामदास, कायदेशीर सल्लागार ॲड. भगवान दामोदर धाईंजे, राहुल पोपट कुंभार, डॉ. गिरीश शिंदे, चंद्रकांत गणपत राजमाने, शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघ आणि नॅशनल युनियन ऑफ बॅकवर्ड एससी एसटी अँड मॅनॉरिटी दिल्ली अर्थात एनयूबीसीचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश संपर्क व प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सत्कार करण्यात आला. संस्था ग्राहकांसाठी पूरवित असणाऱ्या विविध आकर्षक ठेव योजना आणि उपक्रमांची माहिती, यावेळी देण्यात आली. याप्रसंगी प्रभारी अधिकारी विश्वजीत तरडे, क्लार्क शुभम अजिनाथ खरात, क्लार्क आकांक्षा कदम इत्यादी कर्मचारी उपस्थित होते



0 टिप्पण्या