🔰 विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 20/10/2025 : कोणताही सण असो, उत्सव असो वा रोजचा दिवस असो स्वच्छता ही महत्वाची असते. पूर्वीची स्वच्छता व नंतरची स्वच्छता. दोन्ही स्वच्छता जशा महत्वाच्या असतात तसे स्वच्छते नंतरचा कचरा तुम्ही कुठे टाकता ते पण महत्वाचे असते.
घर, अंगण स्वच्छ केले की जबाबदारी संपली असे नसते. उलट निघालेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे महत्वाचे असते. तो कचरा रस्त्यात टाकणे, आहे तिथे पडून देणे, पाण्यात सोडणे किंवा जाळणे या गोष्टी अयोग्य आहेत.
मुलांनो, कितीही नाही म्हटले तरी दिवाळीत तुम्ही थोडे का होईना फटाके उडवणारच. सर्व रस्त्यावर फटाक्याचे कागद होणार. ते उचलायचे कोणी. ती आपली जबाबदारी आहे. आपण उडवलेल्या फटाक्यांचे कागद आपले आपण गोळा करा.
सार्वजनिक स्वच्छता कामगारांचा कचरा गोळा करण्याचा ताण कमी करा.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या