मातोश्री उद्योग समूह आणि निमगाव ग्रामस्थांच्या वतीने आयोजित काँग्रेस कॉर्नर बैठक संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 05/10/2025 :
काँग्रेसचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब आप्पासाहेब मगर यांच्या मार्गदर्शनाखाली निमगाव (मगराचे) येथे मातोश्री उद्योग समूह आणि निमगाव ग्रामस्थांच्या वतीने रविवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी काँग्रेस कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे उपस्थित होते.
या कॉर्नर बैठकीमध्ये भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, दादासाहेब दिनकर मगर, बाळासाहेब आण्णासाहेब मगर, नंदकुमार अगतराव पाटील, सहदेव विठोबा बोडके, वसंत अप्पासाहेब मगर, सचिन बबन यादव, अनिल सुग्रीव मगर, अभिजीत बाळासाहेब मगर, समाधान वसंत मगर, संग्राम दादासाहेब गवळी, सौरभ बाळासाहेब मगर, कृष्णात जाधव, अमोल ज्ञानेश्वर मगर, बाळासाहेब भगवान मगर, इत्यादी मान्यवर आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
काँग्रेसची लोकाभिमुख ध्येयधोरणात्मक वाटचाल, आगामी सर्व निवडणुकांमधील काँग्रेसची रणनीती, पदवीधर मतदार नोंदणी, महिला सशक्तिकरण, वोट चोरी इत्यादी विषय त्याचबरोबर प्रामुख्याने राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या संसाराचे, पिकांचे पशूंचे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी, हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, सरसकट कर्जमाफी व्हावी, ओला दुष्काळ जाहीर करावा इत्यादी विविध विषयांवर तालुकाध्यक्ष गिरीश शेटे आणि जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब मगर यांनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी मातोश्री उद्योग समूह आणि निमगाव व ग्रामस्थांच्या वतीने तालुकाध्यक्ष गिरीश शेटे आणि भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचा सत्कार करण्यात आला.


0 टिप्पण्या