आंतर विभागीय क्रीडा स्पर्धा मध्ये सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

 

आंतर विभागीय क्रीडा स्पर्धा मध्ये सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 31/10/2025 : सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर- अकलूज येथील विद्यार्थ्यांनी दिनांक ३०/१०/२०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशाखा विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत अंतर विभागीय क्रीडा स्पर्धा सातारा येथील यशोदा टेक्निकल कॅम्पस येथे पार पडलेल्या  स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले  असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ प्रवीण ढवळे यांनी दिली.

सदरच्या कुस्ती या क्रीडा प्रकारामध्ये स्पर्धेत प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विभागातील ओम प्रकाश खराडे  या विद्यार्थ्याला कुस्ती (ग्रीक रोमन शैली, ९७ किलो गटात) आंतरक्षेत्रीय स्तरावर (प्रथम क्रमांक)  सुवर्ण पदक मिळाले आहे. त्याची अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे . 

स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील साहिल शंकर बर्वे (बि.टेक. अंतिम वर्ष) या विद्यार्थ्याला कुस्ती (फ्री स्टाईल ९२ किलो गट) मध्ये (दुसरा क्रमांक) रौप्य पदक मिळाले आहे. अखिल जावेद मुजावर (बि.टेक. द्वितीय वर्ष) या विद्यार्थ्याला  (फ्री स्टाईल) तृतीय क्रमांक कांस्य पदक मिळले आहे. 

यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील रुद्रतेज अमरसिंह माने देशमुख (बि.टेक. अंतिम वर्ष) या विद्यार्थ्याला कुस्ती (ग्रीक रोमन सामान्य गट) मध्ये (दुसरा क्रमांक)  रौप्य पदक  मिळाले आहे. प्रथमेश तानाजी माने देशमुख (बि.टेक. द्वितीय वर्ष) कुस्ती या विद्यार्थ्याला कुस्ती(ग्रीक रोमन गट) मध्ये (तृतीय क्रमांक) कांस्य पदक मिळाले आहे.

संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील तनिश भागवत सुळ (बि.टेक. अंतिम वर्ष) या विद्यार्थ्याने  (फ्री स्टाईल ८७ किलो गट)  तृतीय क्रमांक कांस्य पदक मिळाले आहे. 

 विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, संस्थेचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले सदरच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून क्रिडा शिक्षक प्रा. विकास शिवशरण यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या