🔵 निमगावकर पूरग्रस्त मुलांच्या मदतीला आले धावून; 🟠 सिना दारफळ येथील मुलांना शालेय साहित्याचे मोफत वाटप

 

🔵 निमगावकर पूरग्रस्त मुलांच्या मदतीला आले धावून; 

🟠 सिना दारफळ येथील मुलांना शालेय साहित्याचे मोफत वाटप  

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 9/10/2025 :

महाराष्ट्रा मध्ये पुराच्या पाण्याने शेती पिकांचे, अचानक पाणी घरात शिरल्याने अन्न धान्याचे,  मुलांच्या शालेय साहित्याचे  आतोनात नुकसान झाले. ही बाब लक्षात घेऊन  निमगाव म.( ता माळशिरस) येथील ग्रामस्थांनी  सामाजिक बांधलकी जोपासत  सीना  दारफळ व सुलतानपुर  राहुलनगर  ता माढा येथे जाऊन जि प शाळेतील 200 विद्यार्थ्यांना दर्जेदार स्कुल बॅग, वह्या इत्यादी  शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. शालेय साहित्य पाहुन मुले भारावून गेली.

या वेळी पुराच्या पाण्यातुन धाडसाने  नागरिकांचे प्राण वाचविणारे सामाजिक कार्यकर्ते अतुल  गवळी यांचे अभिनंदन करण्यात आले. 

यावेळी  माजी मुख्याध्यापक संभाजीराव मगर, सामाजिक कार्यकर्ते महादेव मगर, भारत मगर प्रकाश पवार, लक्ष्मण पवार,  रामभाऊ मगर, मोहन मगर, सुरेश कुंभार, कालिदास मगर, नवनाथ पराडे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सीना दारफळ येथील जि प शाळेतील शिक्षक पालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या