🔵 मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 27/10/2025 : आपल्यातील अनेकजण भौतिक सुविधा भरपूर असूनही सतत किरकोळ गोष्टींच्यामुळे नाराज असतात. ती नाराजी स्वतःपुरती रहात नाही तर त्यामुळे घरातील वातावरण देखील दूषित होते याचे त्यांना भान नसते.
वास्तविक हल्ली लहानपणापासूनच सर्व गोष्टी न मागता मिळत जातात. लाड अवश्य करावेत पण फाजील लाड नको. नकार ऐकायची पण सवय लावून घेतली पाहिजे. अन्यथा मोठेपणी विशेषतः मुली सासरी गेल्या नंतर हा स्वभाव अडचणीचा होतो.
आहे त्यामध्ये समाधान मानणे गरजेचे आहे. इतरांच्या मानाने आपल्याकडे भरपूर आहे असे समजून घेण्याची सवय सर्वांनाच फायदेशीर ठरते. सुख आपल्या जवळच असते. मात्र आपण ते शोधण्यात आयुष्य निरर्थक घालवतो.
आजचा संकल्प
स्वतःचे सुख स्वतः शोधायचे असते. त्यासाठी इतरांना दोष देणे किंवा नाराज राहणे योग्य नाही हे लक्षात घेऊ व इतरांच्या बरोबर स्वतःला सुखी होऊ.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या