🟡 मनाची शुद्धता


🟡 मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 01/09/2025 :

आपण एकमेकांशी परस्पर संबंध जपत असतो. वाढवत असतो. ते बिघडू नयेत म्हणून काळजी घेत असतो. यासाठी  आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. चुकून संबंध बिघडले तर ते पुन्हा जुळवण्यासाठी  प्रयत्न करतो.

यासाठी प्रत्येकाशी प्रेमाने, आपुलकीने वागणे, काळजी घेणे महत्वाचे असते. शब्द फार जपून वापरावे लागतात. ज्या शब्दांनी माणसे जोडतो तेच शब्द चुकीच्या पद्धतीने वापरले तर माणसे दुरावतात. आर्थिक व्यवहारात लबाडी केली तरी तेच होते.

आपण नीतिमत्तेने, प्रामाणिकपणे वागत असलो तर आपल्याबद्दल समोरच्या व्यक्तीच्या मनात आपोआप आदरभाव निर्माण होतो. तो कायमस्वरुपी टिकवण्याची जबाबदारी मात्र आपली असते. 

आजचा संकल्प

आपण सर्वजण परस्परांच्या बद्दल आदरभाव ठेवू. एकमेकांशी सुसंवाद साधू, काळजी घेऊ. "हम सब एक है"! ही भावना ठेवू व एकसंघ समाजाची बांधणी करू._

सौ. स्नेहलता स. जगताप

##############################

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या