माझी आई अंबाबाई

 

माझी आई अंबाबाई 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,  मुंबई.

 दिनांक 24/09/2025 :

प्रत्येक रुपात दिसते ती मला,

सतत जवळपासच भासते.

माझ्या अंतरातही नित्य वसते,

तिच्याशिवाय मीही नसते.....१


जगते मी, ती आहे साथीला,

सुख-दुःखात बरोबर राहते.

तिच्या भरोशावर नेहमीच

नवनव्या वाटेने चालत असते....२


तिचा वरदहस्त माथ्यावर माझ्या,

कमलचरणी नतमस्तक होते.

माझ्या हृदयमंदिरात स्थान तिचे,

संकटसमयी शरण मी तिला जाते....३


नवदुर्गा, माझी आई अंबाबाई,

जगतजननी, साऱ्यांची जगन्माता.

बसते सिंहासनावर राज्य जगावरी,

भक्तांच्या श्रद्धास्थानी आई चंद्रघंटा ....४


काय वर्णावे मी तिची महती?

आदि किंवा अंत नाही काही तिचा.

दुष्टांचा संहार करते मर्दिनी माता,

महादेवही सन्मान करतात हिचा....५


अशी माझी आई तुळजाभवानी,

महालक्ष्मी माता, जगताची स्वामिनी.

शारदे शतशः नमन तुला, दे आशीर्वाद,

साऱ्या भक्तांना, सर्वांची हृदयवासीनी....६

                 ✍️सौ.धनश्री मनोज उरणे /म्हेत्रस 

                         राहु पिंपळगाव, जि. पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या