रोटरी क्लब अकलूज तर्फे नवदुर्गांचा सन्मान

 

रोटरी क्लब अकलूज तर्फे नवदुर्गांचा सन्मान 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे,  

मुंबई दिनांक 30/09/2025 :

रोटरी क्लब अकलूज व जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, नऊ महिलांचा आधुनिक युगातील नवदुर्गा म्हणून सन्मान पालवी फाउंडेशनचे अध्यक्ष मंगलाताई शहा यांच्या हस्ते करण्यात आला. 

रोटरी क्लब ऑफ अकलूज च्या वतीने दरवर्षी नवरात्राच्या दिवशी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो.  यावर्षी वीर पत्नी, महिला कामगार, प्रगतशील शेतकरी, प्राध्यापक, लेखक, संगणक प्रशिक्षक, डॉक्टर, शिक्षक, महिला व्यवसायिक अशा क्षेत्रामधून 

श्रीमती विद्या पवार, सौ.शकुंतला क्षीरसागर, श्रीमती शैलजा गायकवाड, सौ. संगीता मासाळ, श्रीमती सुप्रिया जाधव, सौ. आशा निकम, डॉ. मयुरा सोनवलकर, डॉ.शरयू भाकरे, सौ. रुपाली पवार, या नऊ महिलांची निवड करून जिजाऊ ब्रिगेड व रोटरी क्लब अकलूज यांच्यातर्फे सन्मानित करण्यात आले.   यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष केतन बोरावके, सचिव अजिंक्य जाधव, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष मनोरामा  लावंड, प्रकल्प प्रमुख तृप्ती कुदळे, तेजस्विनी बोरावके, शारदा चव्हाण, आशा सावंत, सुवर्णा घोरपडे, आशा शेख, प्रवीण कारंडे, नवनाथ नागणे, राजीव बनकर, मनीष गायकवाड, गजानन जंवजाळ, दीपक फडे, कल्पेश पांढरे, संदीप लोणकर आदी  रोटरी क्लब अकलूज व जिजाऊ ब्रिगेडचे सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या