🟪विचारधारा

 


🟪विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 01/09/2025 :

गणेशोत्सव म्हणजे आनंदाची पर्वणी असते. घरात बाप्पासाठी रोज वेगवेगळे मिष्टान्न, वेगवेगळी खिरापत. घरची, शेजारची, मंडळाची आरती. मित्रांच्या बरोबर देखावे पहायला मध्यरात्रीपर्यंत फिरणे, चरणे आणि बरेच काही.

मजा करा पण सामाजिक भान पण ठेवा. गर्दीत माता-भगिनी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक असतात. गर्दीत कोणाला धक्का बुक्की होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्या. कोणी अडचणीत असेल मदत करा, रांगेत दर्शन घ्या.

मुलांनो, सार्वजनिक स्वच्छता हा पण फार महत्वाचा मुद्दा आहे बरं का. काही खाल्ले तर रिकामी पाकिटे, डिश, कागद डिस्टबिन मध्ये टाका. रिकाम्या पाण्याच्या बाटल्या इतस्त: टाकू नका. आपले गाव, आपले शहर स्वच्छ राहील व आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचा ताण वाढणार नाही याची काळजी घ्या.

गणेशोत्सवाला कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या.

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या