स्पर्श
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 24/09/2025 :
बाबा तुझ्या प्रेमाचा स्पर्श
जानवतो आजुनी मला,
तू दुर परदेशात नोकरीसाठी
तरी नजरे समोर ठेवलाय तुला...१
व्हिडिओ कॉल करतोस तू
तेव्हा जवळ मला भासतोस,
आनंद होतो साऱ्या घरात
सर्वां बरोबर बोलत असतोस...२
छोटा जरी असलो मी रे बाबा
साऱ्या घराला संभाळतो,
छोट्या-मोठ्या खोड्या करुन
घरातल्या सगळ्यांना हसवतो...३
तू परदेशात गेल्या पासून रे,
आज्जी-आजोबा शांत राहतात,
आई तुझ्या आठवणीत जगते
ताई दादा पण नाराज असतात...४
जगतो रोज मी ही एकाकी
तरसलो आहे तुझ्या मिठीसाठी,
नको बाबा खुप पैसा अडका
तू माघारी ये घरातल्या सर्वांनसाठी...५
✍️ सौ.धनश्री मनोज उरणे/ म्हेत्रस राहु पिंपळगाव, जिल्हा पुणे
======================

0 टिप्पण्या