🟠 "विघ्नहर्ता पारितोषिक" परीक्षक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचा शिवरत्न गणेशोत्सव मंडळाचे वतीने सन्मान

 🟠 "विघ्नहर्ता पारितोषिक" परीक्षक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचा शिवरत्न गणेशोत्सव मंडळाचे वतीने सन्मान 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 01/09/2025 :

अकलूज नगरपरिषद अकलूज आणि  पोलीस ठाणे अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने गत चार वर्षापासून "विघ्नहर्ता पारितोषिक" उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत शहर आणि ग्रामीण भागातील नोंदणीकृत विविध गणेश उत्सव मंडळाची पाहणी करून गुणांकन करण्यात येत असते. ग्रामीण विभाग खुला गट मधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक निवडले जातात. शहर विभागातून छोटा गट व मोठा गट यामधून प्रत्येकी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढले जातात. शहर आणि ग्रामीण विभागातून निवड झालेल्या गणेशोत्सव मंडळांना ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो.

या अनुषंगाने नगरपरिषद अकलूज आणि पोलीस ठाणे अकलूज यांच्या वतीने परीक्षणाची जबाबदारी सोपविलेले सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचा शिवरत्न गणेशोत्सव मंडळ (विजय चौक,अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने  शनिवार दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रामुख्याने मंडळाचे उपाध्यक्ष उदय सूर्यकांत शेटे यांचे सह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या