✳️ मनाचा पसारा

 ✳️ मनाचा पसारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 05/09/2025 :


संसाराचा पसारा

आवरता आला,

पण मनाचा पसारा

मात्र वाढतच गेला... १


हृदयातील भावनांचा

सारा गोंधळ उडाला,

इच्छा-अपेक्षांचा

त्यावर भरच पडला... २


स्वतःच्या आवडीनिवडी

पसाऱ्यात लुप्त झाल्या,

नात्यांच्या गोतावळ्यात

आठवणी होऊन गेल्या... ३


सवय झाली आता या

साऱ्या पसाऱ्याची मला,

पण जरा जास्त दुखावलं की

साद घालते सख्या तुला... ४


होते तुझ्यापाशी मी

मोकळी सारं काही बोलून,

मनीचा पसारा कमी होतो

तुझ्याशी हितगुज करून... ५


नवी ऊर्जा मिळते तुझ्या

समजून सांगण्यातून,

रमते मी पुन्हा एकदा

संसाररूपी पसाऱ्यातून... ६


✍️सौ.धनश्री उरणे/म्हेत्रस  

मु.पो.  राहु पिंपळगाव, ता.दौंड, जिंल्हा पुणे, पिन :- ४१२२०७

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या